हरियाणामध्ये आज ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला गेला. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच रेवाडीत तिरंगा फडकवला. प्रजासत्ताक दिनी आपल्या भाषणात त्यांनी मोठ्या घोषणा केल्या.
ते म्हणाले, “अंबाला येथून सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीत हरियाणाची महत्त्वाची भूमिका होती. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” यावेळी त्यांनी हरियाणातील जनतेला अनेक भेटवस्तू दिल्या आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरला १० टक्के आरक्षण देण्याबाबत सांगितले. त्याचवेळी त्यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. स्वातंत्र्यसैनिकांसाठी पेन्शन वाढवणे आणि एमएसपीवर शेतकऱ्यांची पिके खरेदी करण्याबाबतही ते बोलले.
हे ही वाचा :
पुलवामाच्या त्राल चौकात पहिल्यांदाच फडकला ‘भारताचा राष्ट्रध्वज’
महाकुंभ: स्नान करण्यासाठी लांबच लांब रांगा, २५ लाख भक्त प्रतीक्षेत!
मुंबई किनारी रस्त्याची उत्तर वाहिनी सोमवारपासून सेवेत
अग्निवीरला राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. या निर्णयामुळे अग्निपथ योजनेंतर्गत देशसेवा केलेल्या तरुणांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकार हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मानधनात दुपटीने एक कोटी रुपये करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.