आज महाकुंभचा १४ वा दिवस आहे. रविवार (२६ जानेवारी) असल्याने स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. संगमात स्नान करण्यासाठी भाविकांना दोन तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागल्याचे समोर आले आहे. सकाळी १० वाजेपर्यंत ३७ लाखांहून अधिक लोकांनी संगमात स्नान केले. संगम परिसरात सुमारे २० ते २५ लाख लोक आहेत, जे संगमात स्नान करण्याची वाट पाहत आहेत.
पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे कि सर्व भाविकांनी इतर घाटांवर स्नान करावे. मोठ्या गर्दीत उभे राहून थांबू नका. भगवान हनुमानांचे दर्शन घेण्यासाठी एक लाख भक्त रांगेत उभे आहेत. कुंभमध्ये होणारी प्रचंड गर्दी पाहता प्रयागराजमध्ये बाहेरून येणारी वाहने १० ते १२ किमी दूर थांबवण्यात आली आहेत. तेथून येणारे भाविक रिक्षा, बसने येत आहेत.
हे ही वाचा :
मुंबई किनारी रस्त्याची उत्तर वाहिनी सोमवारपासून सेवेत
नागा साधूंना १५ मिनिटे दिली तर तुमचा इतिहास संपून जाईल!
टोरेस घोटाळा : सीईओ तौसीफ रियाझच खरा सूत्रधार, झाली अटक