बहुचर्चित टोरेस घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत टोरेसचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तौसीफ रियाझ उर्फ जॉन कार्टर याला अटक केली आहे. या घोटाळ्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. तौसीफला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
तौसीफ रियाझ याने स्वतःला व्हिसलब्लोअर असल्याचा दावा केला होता. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात तो मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. टोरेस कंपनीने मोठ्या प्रमाणावर लोकांकडून गुंतवणूक गोळा केली होती. त्यात अनेक नागरिकांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तक्रारींवर तपास करत मोठे आर्थिक गैरव्यवहार उघड केले आहेत.
हे ही वाचा:
पॅलेस्टिनींना शांततेत राहण्यासाठी इतरत्र घरे बांधावीत
ठाकरेंच्या स्वबळावर पवारांची बत्ती !
जयेश मेस्त्री लिखित, दिग्दर्शित ‘जादूचा दिवा’ बालनाट्याला घवघवीत यश
टोमणेबाईंची तडफड, फडफड सांगतेय, डील फिस्कटले…
तौसीफ रियाझ याने लोकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींची चौकशी होण्याची शक्यता आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तौसीफच्या अटकेला महत्त्वपूर्ण मानले आहे. घोटाळ्यातील आणखी गुंतागुंतीचे धागेदोरे तपासण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुंतवणूकदारांवर झालेले परिणाम पाहता, या प्रकरणाने आर्थिक विश्वात खळबळ उडवली आहे.