भारतीय जनता पक्षाचे आमदार टी राजा सिंह त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी २०१२ मध्ये दिलेल्या ‘१५ मिनिटे’ वक्तव्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान हैदराबादमधील गोशामहल सीटचे आमदार राजा सिंह म्हणाले, “जे १५ मिनिटे बोलतात, ते ऐका – जर नागा साधूंना १५ मिनिटे दिली तर तुमचा संपूर्ण इतिहास संपून जाईल.
राजा सिंह आपल्या भाषणात म्हणाले, ‘आम्हाला १५ मिनिटे द्या, पोलिसांना हटवा, आम्ही १०० कोटी हिंदूंना संपवू’, अशी भाषा करणाऱ्यांनो ऐका. युपीमधील महाकुंभात लाखो-करोडो भाविक स्नान करत आहेत. लाखो साधूसंत मेळ्यात सहभागी होत आहेत. या साधू संतांमध्ये एक संत आहेत ते म्हणजे ‘नागा साधू’.
हे ही वाचा :
टोरेस घोटाळा : सीईओ तौसीफ रियाझच खरा सूत्रधार, झाली अटक
भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशींना अटक!
उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता २७ जानेवारीला लागू होणार
ते पुढे म्हणाले, नागा साधूंचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, नागा साधू सर्वांसमोर येत नाहीत, केवळ कुंभमेळ्या दरम्यान बाहेर पडतात. त्यांचा इतिहास पाहिला तर जेव्हा सनातनवर संकट आले तेव्हा नागा साधूंनी तलवार, भाला, त्रीशुल उचलून मुल्लांचे शिर छाटण्याचे काम केले आहे.
नागा साधूंना १५ मिनिटे दिली तर सुरवातीला युपीचे मुल्ले साफ होतील, नागा साधूंना हैदरबादमध्ये पाठवले तर ‘१५ मिनिट द्या’ म्हणणारे भुंकणारे कुत्रे भारत सोडून पाकिस्तानला पळून जातील. ते पुढे म्हणाले, हिंदू जेव्हा जेव्हा उठला आहे, तेव्हा तेव्हा इतिहास रचला आहे.
15 मिनट की बात करने वालों, सुन लो – अगर हम नागा साधुओं को आगे कर दें, तो तुम्हारा पूरा इतिहास खत्म हो जाएगा। pic.twitter.com/a5uTrvsJb6
— Raja Singh (@TigerRajaSingh) January 25, 2025