26 C
Mumbai
Thursday, February 5, 2026
घरविशेषविश्वबंधुत्व दिनानिमित्त आयोजित कृती कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद

विश्वबंधुत्व दिनानिमित्त आयोजित कृती कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद

शैक्षणिक संस्थांना शिकागो भाषण कृती कार्यक्रम होते सुचवले

Google News Follow

Related

विश्वबंधुत्व दिनानिमित्त म्हणजेच ११ सप्टेंबर २०२४ रोजी सांगलीतील काही नागरिकांनी स्वामी विवेकानंद शिकागो भाषण कृती कार्यक्रम शैक्षणिक संस्थांना सुचवले होते. या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाला. १९० जणांनी भाषण पाठ म्हटले, ८५०० जणांनी पाठ लिहिले तर काही भाषणेही झाली.

समजतील अनेक प्रश्नांचे मूळ ‘स्व’ चा बोध नसणे, ‘स्व’ राष्ट्राचा बोध नसणे आणि सर्व मानव सुखी होतील यासाठी कोणत्या मूल्यांची जपणूक केली पाहिजे, याविषयीची नीट व गांभीर्य व्यक्तींना नसणे यामध्ये आहे असे वाटते. मानवी जीवनाची सार्थकता, राष्ट्रीय सर्वांगीण परम वैभवाची नेमकी दिशा, आणि त्यामधून होणारी मानवी जीवन सुखी होण्याची धारणा या तीनही गोष्टी नीट समजून देण्यासाठी अंगभूत शक्ती असलेले जागतिक सर्वधर्म परिषदेतील स्वामी विवेकानंदांचे पाच मिनिटांचे हे भाषण आहे.

हेही वाचा..

ऑपरेशन सिंदूर दरम्यान मसूद अझहरचे कुटुंब उध्वस्त!

‘साधेपणाला प्राधान्य देणारे नेते आहेत पंतप्रधान मोदी’

मुंबई क्राईम ब्रांचने केला दरोड्याचा पर्दाफाश

मत्स्यासन : पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त

यासंबंधी तीन कृती कार्यक्रम समाजातील सर्व व्यक्तींनी, संघटनांनी करावेत असे सुचविण्यात आले होते. स्वामी विवेकानंद यांचे भाषण पाठ करण्याच्या स्पर्धा घेणे, तसेच हे भाषण शुद्ध मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत लिहिण्याच्या स्पर्धा घेणे असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी आवश्यक सामग्री पुरवण्यात आली होती. आठ महिन्यांच्या कालावधीत सर्वांनी कार्यक्रम आपापल्या संस्थांचे म्हणून करावेत असं आवाहनही करण्यात आले होते. आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून १९० जणांनी भाषण पाठ म्हटले, ८५०० जणांनी पाठ लिहिले तर काही भाषणेही झाली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा