20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरविशेषहेमा मालिनी यांनी गुलाबराव पाटलांना दिले हे उत्तर

हेमा मालिनी यांनी गुलाबराव पाटलांना दिले हे उत्तर

Related

शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार हेमा मालिनी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला हेमामालिनी यांनी तेवढेच दिलदारपणे उत्तर दिले आहे. त्यांनी मिश्किल उत्तर देत सर्वांची मने जिंकली.

हेमामालिंनींना जेव्हा गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा त्या म्हणाल्या की, मला माझे गाल प्रॉपर्ली आणि सेफली ठेवावे लागतील. लालू प्रसाद यांनी काही वर्षांपूर्वी ही प्रथा पाडली पण त्यामुळे मला फरक पडत नाही. मात्र महिलांबद्दल असे विधान करणे योग्य नाही.

गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात म्हटले होते की, माझ्या धरणगाव मतदारसंघात या रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत केलेले आहेत.

गुलाबराव पाटील यांच्या या विधानावर टीका झाली तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाटील यांना सांभाळून घेतले. भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी असे विधान करणे योग्य नव्हे अशी गुलाबरावांवर टीका केली. ते म्हणाले की, गुलाबरावांचे हे विधान चुकीचे आहे. पण यावर राज्याचे मुख्यमंत्री कारवाई करतील की नाही, हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच आपल्या नेत्यांना पाठीशी घालण्याचे काम करतात.

हे ही वाचा:

मतदार ओळखपत्राला नवा ‘आधार’! लोकसभेत विधेयक मंजूर

जानेवारीत होणार आयपीएल मेगा लिलाव?

संजय राऊतांच्या उलट्या बोंबा

‘सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत’

 

संजय राऊत यांनी म्हटले होते की, अशाप्रकारची तुलना याआधीही करण्यात आली होती. पण आम्हाला हेमामालिनी यांच्याविषयी आदर आहे. त्या वक्तव्याचा नकारात्मक अर्थ घेऊ नये. लालूप्रसाद यांनीही असेच एक वक्तव्य याआधी केले होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा