28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरविशेष...आणि ती बनली यंदाची पहिली करोडपती

…आणि ती बनली यंदाची पहिली करोडपती

Related

नुकतेच ‘कौन बनेगा करोडपती’ हिंदीचे १३वे पर्व सुरू झाले आहे. या बहुचर्चित कार्यक्रमाला त्यांचा पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे.

हिमानी बुंदेला या २५ वर्षीय तरुणीने ‘कौन बनेगा करोडपती’ या हिंदी कार्यक्रमाच्या १३व्या पर्वाची पहिली करोडपती बनण्याचा मान मिळवला आहे. कार्यक्रमात विचारलेल्या १५ प्रश्नांची अचूक उत्तर देत तिने एक करोड जिंकले आहेत. हिमानी आग्रामध्ये एक शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांनी काही वर्षांपूर्वी अपघातात त्यांची दृष्टी गमावली आहे.

हिमानीला लहानपणापासूनच ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता होती. लहानपणी ती तिच्या मित्र मैत्रिणींसोबत ‘कौन बनेगा करोडपती’ खेळत असे, त्यात ती स्वतः अमिताभ बच्चन यांची भूमिका करत असे. मोठेपणी या खेळात सहभागी होण्याची इच्छा तेव्हापासूनच होती, असे हिमानीने टाइम्स समूहाशी बोलताना सांगितले. १३ व्या वर्षापासूनच सामान्य ज्ञान विषयाची आवड निर्माण झाली होती. दिवसाची सुरुवात चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान विषयीचे वाचन करूनच होते. त्यामुळे या खेळासाठी विशेष अशी तयारी करावी लागली नाही. केवळ थोडी उजळणी केली, असे हिमानीने सांगितले.

हे ही वाचा:

तालिबानी शाहिद आफ्रिदी?

सिंहराज अधानाने मिळवले कांस्य पदक

हल्ला करणारा पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल

लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा

जिंकलेल्या रुपयांचे काय करणार, असे विचारले असता तिने सांगितले की, पैसे कितीही असू देत पण त्यातून दिव्यांग मुलांसाठी एक शिक्षण संस्था सुरू करायची आहे. तिथे ते स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करू शकतील. जिथे सर्व दिव्यांग मुलांना एका छताखाली शिकता येईल.

२०११ मध्ये जेव्हा हिमानी १५ वर्षांची होती तेव्हा तिच्यासोबत झालेल्या एका अपघातात तिची दृष्टी गेली. तो काळ खूपच कठीण होता. कुटुंबासाठीही कठीण काळ होता पण त्यांनीच साथ दिली. विशेषतः भाऊ- बहिणीने कधीच निराश होऊ दिले नाही. माझा आत्मविश्वास वाढवण्यात त्याचे बहुमूल्य योगदान आहे, असे हिमानीने सांगितले. हिमानीने गणिताच्या काही सोप्या पद्धती शोधून काढल्या आहेत. मॅजिक मॅथ्स या नावाने ती विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने गणित शिकवते. आई आणि बहिण यांच्यामुळे गणितात आवड निर्माण झाल्याचे तिने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा