28 C
Mumbai
Tuesday, September 29, 2026
घरविशेषबेघर मुलांच्या आयुष्याला मिळणार आधार; वसतिगृह प्रकल्पाचे भूमिपूजन

बेघर मुलांच्या आयुष्याला मिळणार आधार; वसतिगृह प्रकल्पाचे भूमिपूजन

जीवन संवर्धन फाउंडेशनतर्फे पुढाकार

Google News Follow

Related

बेघर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू मुलांना सुरक्षित निवारा, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी आधार मिळावा, या उद्देशाने जीवन संवर्धन फाउंडेशनतर्फे ‘अनिकेत मुलांचे वसतिगृह’ उभारण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मुक्काम पोस्ट म्हारसकुळ, भारत गॅस गोडाऊनजवळ, टिटवाळा येथे हा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या प्रकल्पामुळे समाजातील वंचित आणि गरजू मुलांना निवारा मिळण्याबरोबरच त्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या प्रकल्पाचे भूमिपूजन डॉ. राजकुमार ऊर्फ राजाभाऊ पातकर आणि सामाजिक कार्यकर्त्या राखी राजाभाऊ पातकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. भूमिपूजन सोहळ्याला रुस्तोगी इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा:

शेअर बाजारात जोरदार कमबॅक; सेन्सेक्स ३३१ अंकांनी वधारला

दिल्लीतील मुस्कान शर्मा लव्ह जिहाद प्रकरणातल्या आरोपीला घातली गोळी

अमेरिकेवर ४० ट्रिलियन डॉलरचे कर्ज

मोदींसोबत छोट्या विद्यार्थिनींचा रक्षाबंधनाचा उत्साह

या उपक्रमाचे निमंत्रक सदाशिव चव्हाण, संस्थापक अध्यक्ष, जीवन संवर्धन फाउंडेशन (जेएसएफ) आहेत. त्यांच्या पुढाकारातून गरजू मुलांसाठी सुरक्षित आणि आधार देणारं वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प उभारला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा