कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या मासिक बुलेटिननुसार, मे २०२५ मध्ये भारतात नव्याने नोंदणीकृत कंपन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्क्यांची वाढ झाली आहे. मे महिन्यात एकूण २०,७१८ नव्या कंपन्यांची नोंदणी झाली, जी देशातील आर्थिक घडामोडींमध्ये तेजीचे द्योतक आहे.
महत्त्वाची आकडेवारी: ३१ मे २०२५ पर्यंत भारतात नोंदणीकृत कंपन्यांची एकूण संख्या: २८,९६,९४३, यापैकी सक्रिय कंपन्या: १८,९०,३०५ (एकूणाचा ६५% भाग). एप्रिल २०२५ च्या तुलनेत सक्रिय कंपन्यांच्या प्रमाणात वाढ: ०.२% नोंदणीकृत नव्या कंपन्यांचे क्षेत्रानुसार वितरण:
हेही वाचा..
आपल्या संस्कृतीत सर्व प्राण्यांमध्ये ईश्वराचे अस्तित्व
सेनाप्रमुखांच्या भूतान दौऱ्यातून काय साध्य होणार ?
निवडणूक आयोगाचे मतदार पुनरीक्षण हा मोठा मुद्दा
काँग्रेसचे १५० नेते होते रशियाचे एजंट!
आर्थिक क्रियाकलाप टक्केवारी
सामुदायिक, वैयक्तिक व सामाजिक सेवा २७ %
व्यापार (Trade) १७ %
उत्पादन (Manufacturing) १५ %
बिझनेस सर्व्हिसेस १५ %
राज्यानुसार नव्या नोंदणीचे वितरण (मे २०२५):
राज्य नोंदणी झालेल्या कंपन्या टक्केवारी
महाराष्ट्र ३,४५८ १७ %
उत्तर प्रदेश २,३७९ ११ %
दिल्ली १,८५८ ९ %
भारतातील परकीय कंपन्यांची स्थिती (३१ मे २०२५ पर्यंत): एकूण परकीय कंपन्या: ५,२४७, सक्रिय परकीय कंपन्या: ३,२९३ (६३%), मार्च–मे २०२५ दरम्यान नोंदणीकृत २८ नवीन परकीय व्यावसायिक संस्था : कर्नाटक: २१ %, हरियाणा व महाराष्ट्र: प्रत्येकी १८ %, गुजरात: १४ %, उत्तर प्रदेश: ११, तेलंगणा: ७ %, मध्य प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू: प्रत्येकी ४ %
