दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपचे अनेक मंत्री आणि नेते दिल्लीच्या निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी आले आहेत. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला आहे. मंत्री जयशंकर म्हणाले की, राष्ट्रीय राजधानीतील लोकांना मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे परदेशात कबूल करण्यास मला “लाज” वाटते. शनिवारी (१ फेब्रुवारी) जेएलएन स्टेडियममध्ये दक्षिण भारतीय समुदायाला संबोधित करताना मंत्री जयशंकर बोलत होते.
अंबादास दानवेंनी बाळासाहेबांना चूक ठरवले!
मुंडे-अजितदादा दोघेही आरसा साफ करताय…