भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकतीच जगद्गुरू रामभद्राचार्य यांची चित्रकूट येथील आश्रमात भेट घेतली. लष्करप्रमुखांनी आश्रमाला भेट दिली आणि सद्गुरू नेत्र रुग्णालयात सिम्युलेटर मशीनचे उद्घाटन केले. लष्करप्रमुखांच्या भेटीदरम्यान, जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी त्यांना दीक्षा दिली. आता रामभद्राचार्य यांनी दीक्षा घेण्याच्या बदल्यात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदींकडे केलेली मागणी उघड केली आहे. रामभद्राचार्य यांनी खुलासा केला की दक्षिणा म्हणून त्यांनी लष्करप्रमुखांकडून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मागितले.
लष्करप्रमुखांच्या भेटीची माहिती देताना जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणाले, “मी त्यांना राममंत्राची तीच दीक्षा दिली, जी भगवान हनुमानाने माता सीतेकडून घेतली होती आणि नंतर लंका जिंकली होती. त्यानंतर मी त्यांच्याकडे दक्षिणा मागितली आहे की मला पीओके परत हवे आहे.”
‘सद्गुरु सेवा केंद्रा’च्या एका सदस्याने माहिती दिली की, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि सद्गुरु यांनी त्यांच्या केंद्राला भेट दिली. जगद्गुरू आणि लष्करप्रमुखांनी वैद्यकीय प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे सिम्युलेटर मशीन पाहिले. संपूर्ण भारतात अशा फक्त चार ते पाच मशीन आहेत आणि मध्य प्रदेशातील ही पहिली मशीन आहे. या मशीनचे त्यांनी उद्घाटन केले.
हे ही वाचा :
तुषार देशपांडे सज्ज आहे इंग्लंड जिंकायला!
झिम्बाब्वेविरुद्ध शानदार शतकांनी इंग्लंडच्या फलंदाजांची ICC टेस्ट रँकिंगमध्ये झेप
‘माझ्या वक्तव्यांचा स्वार्थासाठी विपर्यास, उदित राज यांचे वक्तव्य अतिउत्साहातून’
तमन्ना, प्रिया आणि दीपकची सेमीफायनलमध्ये; भारतासाठी कांस्यपदक नक्की!
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर अधिक अलर्ट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविली जात आहे. दहशतवाद्यांना शोधून ठार केले जात आहे. आजच्या कारवाईत जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलाकडून पुढील कारवाई सुरु आहे.
