काँग्रेस खासदार शशी थरूर सध्या परदेश दौऱ्यावर असून तिथे ते भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत भारताची भूमिका मांडत आहेत. त्यावर काँग्रेस नेते उदित राज यांनी थरूर यांना लक्ष्य केले होते. त्यावर थरूर यांनी काँग्रेस नेते उदित राज यांचं नाव न घेता त्यांना ‘अति उत्साही’ असं म्हणत टोला लगावला. थरूर यांच्या मते, भारताच्या अतिरेकी विरोधी कारवायांबाबत त्यांच्या केलेल्या वक्तव्याचा “स्वार्थासाठी विपर्यास” केला जात आहे.
तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी पनामा ते बोगोटा (कोलंबिया) या प्रवासादरम्यान एक्सवर (Twitter) स्पष्ट केलं की ते अलीकडील अतिरेकी हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईबद्दल ते बोलत होते, भूतकाळातील युद्धांबाबत नव्हे.
खरं तर, काँग्रेस नेते उदित राजच नव्हे, तर पक्षातील अनेक सदस्यांनी थरूर यांच्यावर टीका केली. थरूर यांनी पनामा दौऱ्यात मोदी सरकारच्या “झिरो टॉलरन्स” दहशतवादविरोधी भूमिकेचं कौतुक केल्यामुळे त्यांच्यावर भाजपचा ‘सुपर प्रवक्ता’ असल्याचा आरोप करण्यात आला.
थरूर म्हणाले की, टीकाकार आणि ट्रोल्सना त्यांच्या विकृत मतप्रदर्शनाचं स्वातंत्र्य आहे कारण त्यांच्याकडे चांगलं काम नाही.” “माझं विधान त्या घटनांशी संबंधित होतं ज्या काळात LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कारवाई नियंत्रित किंवा अडवली जात होती. पण नेहमीप्रमाणे, टीकाकार माझ्या शब्दांचा विपर्यास करत आहेत आणि मी त्यांचं स्वागत करतो.”
हे ही वाचा:
छत्तीसगडचा बस्तर ४० वर्षांनी ‘नक्षलमुक्त’
‘हेरगिरी’ केल्याच्या आरोपाखाली काँग्रेस नेत्याच्या माजी सहकाऱ्याला अटक!
नमाजापूर्वी ब्राह्मोस पाकिस्तानी तळांवर धडकली !
राखेच्या ढिगाऱ्यात ट्रम्प काय शोधतायत ?
विवाद कशामुळे सुरू झाला?
ऑपरेशन सिंदूरनंतर पनामा दौऱ्यावर गेलेल्या बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करताना थरूर यांनी म्हटलं होतं की, “अलीकडील काळात भारताचं दहशतवादावरचं धोरण बदललं आहे आणि आता अतिरेकी समजतात की त्यांच्या कृत्यांना परिणाम भोगावे लागतील.” त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
उदित राज यांनी प्रतिक्रिया दिली की, थरूर यांना भाजपचा ‘सुपर प्रवक्ता’ घोषित केलं जावं. उदित राज यांनी असा आरोप केला की थरूर हे असं सुचवत आहेत की जणू मोदी सरकारच्या आधी भारताने कधीच LOC किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली नव्हती.
उदित राज म्हणाले, “१९६५ मध्ये भारतीय लष्कराने लाहोर सेक्टरमध्ये पाकिस्तानात घुसून धक्का दिला होता. १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानाचे दोन तुकडे केले. UPA सरकारच्या काळातही अनेक सर्जिकल स्ट्राईक्स झाल्या होत्या, पण त्यांचं राजकारण केलं गेलं नाही. तुम्ही त्या पक्षाशी इतके बेईमान कसे होऊ शकता ज्याने तुम्हाला इतकं दिलं?”
काँग्रेस प्रवक्ते पवन खेड़ा यांनीही उदित राजच्या भूमिकेचं समर्थन करत थरूर यांच्या ट्विटला रीपोस्ट केलं.
