पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी (२८ मे) त्या रात्रीच्या घटनांची आठवण करून दिली जेव्हा भारताने दहशतवादी अड्ड्यांवर आणि नंतर पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला होता. यादरम्यान त्यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानने सकाळच्या नमाजानंतर भारतावर हल्ला करण्याची योजना आखली होती, परंतु त्याआधीच भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला केला.
अझरबैजानमधील लाचिन येथे झालेल्या पाकिस्तान-तुर्की-अझरबैजान त्रिपक्षीय शिखर परिषदेला संबोधित करताना शाहबाज शरीफ यांनी हे उद्गार काढले. शाहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य फजरच्या नमाजानंतर पहाटे ४.३० वाजता भारतावर हल्ला करणार आहे. पण ही वेळ येण्यापूर्वीच भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर आणि अनेक राज्यांवर हल्ला केला. भारताने नूरखान (रावळपिंडी) आणि मुरीद (चकवाल) नष्ट केले.”
पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सर्व कबूल करत असताना पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी असेही म्हटले की दोन्ही पक्षांनी एकत्र बसून काश्मीर, पाणी आणि दहशतवादासह इतर प्रश्न सोडवायला हवेत. दरम्यान, यापूर्वी देखील त्यांनी भारतासोबत या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते.
हे ही वाचा :
छत्तीसगडचा बस्तर ४० वर्षांनी ‘नक्षलमुक्त’
‘हेरगिरी’ केल्याच्या आरोपाखाली काँग्रेस नेत्याच्या माजी सहकाऱ्याला अटक!
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करच्या २ दहशतवाद्यांना अटक!
बालंबाल बचावलेल्या सिंगापूरची महिला म्हणाली, ऑपरेशन सिंदूर आमच्या हृदयाच्या जवळचे
दोन दिवसांपूर्वी तेहरान दौऱ्यावर असताना शरीफ म्हणाले, सर्व वाद सोडवण्यासाठी ते भारताशी चर्चा करण्यास तयार आहेत. तथापि, भारताने स्पष्ट केले आहे की पाकिस्तानशी कोणतीही चर्चा ही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे आणि दहशतवादाच्या मुद्द्यापुरती मर्यादित असेल.
यावेळी शरीफ म्हणाले, “आपण एकत्र बसून शांततेसाठी चर्चा केली पाहिजे. असे काही मुद्दे आहेत ज्यांवर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे आणि ते संवादाद्वारे सोडवले पाहिजेत. मी पूर्ण नम्रतेने म्हटले आहे की आपल्याला या प्रदेशात शांतता हवी आहे. यासाठी अशा मुद्द्द्यांवर संवाद आवश्यक आहे, ज्यांवर त्वरित लक्ष देण्याची आणि तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
