अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या पाकिस्तानच्या प्रेमात आहेत. ट्रम्प कुटुंबाची ६० टक्के मालकी असलेल्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शिअलच्या शिष्टमंडळाने पहलगाम हल्ल्यानंतर २६ एप्रिल रोजी केलेल्या पाकिस्तान दौऱ्याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. परंतु ट्रम्प आणि पाकिस्तानची ही लव्ह स्टोरी जानेवारीमध्ये किंवा त्याही आधी सुरू झालेली आहे. डब्ल्यूएलएफचा संबंध ट्रम्प यांच्या क्रिप्टो करन्सीच्या व्यवसायाशी आहे. हे शिष्टमंडळ पाकिस्तानात आले तेव्हा त्यांचे शाही स्वागत करण्यात आले. ट्रम्प हा व्यापारी माणूस आहे.
व्यापाऱ्याचे पहिले प्रेम पैशावर असते. मग पाकिस्तानसारख्या भिकारी देशावर ट्रम्प यांचे प्रेम ऊतू का जाते आहे? हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्याचे उत्तर शब्बर झैदी या पाकिस्तानी चार्टर्ड अकाऊंटंटने एका वर्षांपूर्वी दिलेले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान पदी इम्रान खान असताना शब्बर झैदीची नियुक्ती फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूवर करण्यात आली. २०२४ साली एका मुलाखतीत त्याने धमाका केला. ब्रिटन, अमेरीका, दुबई, युरोपमध्ये १०० अब्ज डॉलर्स इतका काळा
पैसा इमारती, विदेशी बँकांचे शेअर, शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आले असल्याचे त्याने सांगितले.
झैदी जे काही म्हणाले, तो आकडा खूपच कमी आहे. २०१८ साली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात देशातील काळ्या पैशाबाबत झालेल्या एका सुनावणीत तिथल्या सेण्ट्रल बँकेचे अध्यक्ष तारीक बाज्वा यांनी यूएईमध्ये १५० अब्ज डॉलर्सची मालमत्ता असलेल्या १२५ लोकांची यादी आमच्याकडे असल्याची माहिती न्यायालयाला दिली. लंडनमध्ये मालमत्ता असलेल्या आणखी २२५ लोकांची यादी आमच्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले. इम्रान खान तेव्हा पाकिस्तानचा पंतप्रधान होता. त्यांच्या नेतृत्वाखाली विदेशातील ही मालमत्ता खणून काढण्यासाठी एक टास्क फोर्स बनवला होता. त्याला पाकिस्तानच्या करदात्यावर होणारा अन्याय संपवायचा होता. म्हणून त्याने हा पंगा सुरू केला. त्यामुळेच कदाचित इम्रान आज पाकिस्तानच्या तुरुंगात सडतो आहे. त्याच्यावर तुरुंगात बलात्कार झाल्याच्या बातम्या बाहेर येतायत. कारण तो ज्या मालमत्तेवर कुऱ्हाड चालवायला निघाला होता ती मालमत्ता पाकिस्तानातील राजकीय नेते, लष्करशहांची होती.
हा तोच पैसा आहे, ज्यावर सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नजर आहे. हा तोच पैसा आहे, ज्यामुळे ट्रम्प पाकिस्तानच्या प्रेमात पडले आहेत. पाकिस्तान भिकारी देश असला तरी या देशाचे नेते आणि लष्करी अधिकारी
श्रीमंत आहेत, ही बाब त्याच्या आधीही उघड झाली होती. पनामा मोझँक फॉन्सेका या लॉ फर्मची ११.५ दशलक्ष कागदपत्र गहाळ झाली. त्यातली माहिती जगभरात व्हायरल झाली. त्यात अनेक राजकीय नेत्यांकडे असलेल्या काळ्या संपत्तीचा पर्दाफाश झाला. यात नवाज शरीफ आणि सैफुल्ला खान यांच्या कुटुंबियांकडे असलेल्या काळ्या पैशाच्या आकड्यांची माहितीसुद्धा चव्हाट्यावर आली.
या सगळ्या आकडेवारीची आठवण होण्याचे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाची ६० टक्के मालकी असलेल्या बर्ल्ड लिबर्टी फायनान्शिअल या कंपनीने पाकिस्तान क्रिप्टो काऊंसिल सोबत करार केला. हा करार २६ एप्रिल रोजी झाला.
म्हणजे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या चार दिवसात हा करार झाला होता. डब्ल्यूएलएफच्या शिष्टमंडळात. मध्यपूर्वेतील अमेरीकेचा विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांचा मुलगा झॅकरी, ट्रम्प यांचा निकटवर्तीय असलेल्या
ग्रेण्टी बीच याचा मुलगा ग्रेण्टी ज्युनियर, झॅक फोकमन, चॅस हॅरो यांचा समावेश होता. ग्रेण्टी बीच हा अमेरिकी उद्योपती आहे. ट्रम्प यांचा फायनान्सर आहे.
ट्रम्प यांच्या निवडणुकांच्या खर्चाची बाब हा बीच पाहातो. ट्रम्प यांचा प्रतिनिधी म्हणून त्याने जानेवारी २०२५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला. त्यानंतर बांगलादेश आणि तुर्कीयेचाही दौरा केला. हे तिन्ही देश आज भारताच्या विरोधात
आहेत. भारताचे हाडवैरी आहेत. २६ एप्रिलला पाकिस्तानमध्ये झालेल्या डब्ल्यूएलएफ आणि पीसीसीच्या बैठकीची
जगभरात चर्चा झाली. परंतु त्या आधी जानेवारीमध्ये झालेल्या ग्रेण्टी बीचच्या पाकिस्तान दौऱ्याकडे फार कुणाचे लक्ष गेले नाही. याच दौऱ्यात २६ एप्रिलमध्ये होणाऱ्या बैठकीची पूर्व तयारी केली होती.
जानेवारीत झालेला ग्रेण्टी बीच याचा दौरा म्हणजे निव्वळ साखर पेरणी होती. या दौऱ्यात त्याने पाकिस्तानी नेत्यांची प्रचंड भलामण केली होती. पाकिस्तान हा जगात सर्वाधिक गैरसमज असलेला देश आहे. आम्ही पाकिस्तानकडे दक्षिण
आशियाचा चेहरा म्हणून पाहातो. पाकिस्तानी नेत्यांच्या डोळ्यात आम्हाला फक्त शांतीची आस दिसते. आम्हाला पाकिस्तानची गरज आहे. अमेरिकेला हवे असलेले पाकिस्तानकडे आहे, पाकिस्तानला हवे असलेले अमेरिका देऊ शकतो.
आम्हाला एकत्र व्यापार करायचा आहे. पाकिस्तानमध्ये व्यापारासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करायचे आहे. जेणे करून दोघांचा चांगला पैसा कमावता येईल. आधीच्या सरकारने पाकिस्तानवर निर्बंध लादले. दोन्ही देशांमधील संबंधांचे पूल जाळून टाकले.
ग्रेण्टी यांचे भाषण ऐकणारा माणूस परग्रहावरील असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. जगातील अन्य देश पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणूनच ओळखतात. परंतु ग्रेण्टी बीच जे काही म्हणाला, ते त्यांच्या मनातील नसून खुद्द ट्रम्प यांच्या मनातले आहे. पाकिस्तान क्रिप्टो काऊंसिलचा सल्लागार म्हणून चॅंगपेग झाओ याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा बिनान्स फायनान्स या कंपनीचा संस्थापक आहे. हवाला प्रकरणी अमेरिकेच्या तुरुंगात अटकेत होता. त्याला ४.५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. चार महिन्याचा तुरुंगवास भोगल्यानंतर अलिकडेच त्याची सुटका करण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे तो कॅनेडीअन असला तरी जन्माने चिनी आहे. म्हणजे या क्रिप्टो कराराच्या निमित्ताने अमेरिकी, चीनी
आणि पाकिस्तानी एकत्र आलेले आहेत.
हे ही वाचा:
इराणमध्ये ३ भारतीय नागरिक बेपत्ता!
पाकिस्तान संपूर्ण जगात दहशतवाद पसरवतो !
काँग्रेस नेता आणि ऑलिम्पियन बजरंग पूनिया म्हणतो, गुंडगिरीपुढे कायदा हरला!
“आली रे आली… आता इंग्लंडची वेळ आली!”
डब्ल्यूएलएफचे शिष्टमंडळ २६ फेब्रुवारी रोजी जेव्हा पाकिस्तानात आले तेव्हा त्यांचे शाही स्वागत करण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, उपपंतप्रधान इशाक दार, जनरल आसिफ मुनीर ज्यांना भारताकडून मार
खाल्ल्यानंतर फिल्ड मार्शलपदी बढती देण्यात आली आहे, माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, अर्तमंत्री मोहम्मद औरंगजेब, पीपीसीचा मुख्य कार्यकारी अधिकारी बिलाल बिन साकीब, बँक ऑफ
पाकिस्तानचा गव्हर्नर हे सगळे या शिष्टमंडळाला भेटले. आता त्या प्रश्नाकडे वळू की ट्रम्प यांना पाकिस्तानकडून शऱीफ कुटुंबियांकडून काय हवे आहे. या प्रश्नाचे उत्तर आपण आधीच्या भागात पाहिले आहे. पाकिस्तानचा आजचा जीडीपी ३७३ अब्ज डॉलर्स इतका आहे. तितकाच पाकिस्तानी काळापैसा जगात फिरतो आहे.
ट्रम्प यांच्या डब्ल्यूएलएफ या कंपनीने ट्रम्प, यूएसडी१ असे काही क्रिप्टो कॉईन बाजारात आणलेले आहेत. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असे पर्यंत या त्यांच्या या क्रिप्टो करन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतणूक व्हावी असा त्यांचा प्रयत्न आहे. याचसाठी त्यांना आपली माणसे पाकिस्तानात पाठवली. त्यांना शरीफ, मुनीर आणि पाकिस्तानच्या अन्य धनदांडग्यांचा पैसा हवा आहे, जो त्यांनी पाकिस्तानी जनतेकडून लुटलेला आहे. जगभरातील दहशतवादी एकेकाळी पैशाची नेआण करण्यासाठी हवालाचा वापर
करायचे. आता त्यांना क्रिप्टोच्या रुपात तंत्रज्ञानाचा राजमार्ग मिळाला आहे. त्यामुळे भारताला या अभद्र युतीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांसाठी सज्ज राहण्याची गरज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
