32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषमेक इन इंडिया अंतर्गत होणार ११४ लढाऊ विमानांची खरेदी

मेक इन इंडिया अंतर्गत होणार ११४ लढाऊ विमानांची खरेदी

Google News Follow

Related

“भारतीय हवाई दल ११४ मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्टच्या प्रस्तावित खरेदीला अंतिम स्वरूप देत मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत या विमानांची खरेदी करणार आहे,” असे एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी मंगळवारी सांगितले.

एप्रिल २०१९ मध्ये, भारतीय हवाई दलाने सुमारे १८ अब्ज डॉलर्समध्ये ११४ जेट्स विकत घेण्यासाठी प्रारंभिक निविदा जारी केल्या होत्या. अलिकडच्या वर्षांत ही जगातील सर्वात मोठी लष्करी खरेदी आहे.

८ ऑक्टोबर रोजी हवाई दल दिनापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना आयएएफ प्रमुख म्हणाले की, अनेक एरोस्पेस कंपन्यांकडून आरएफआयला प्रतिसाद मिळाला आहे आणि अधिग्रहण प्रक्रिया पुढील टप्प्यात पुढे नेली गेली आहे.

मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत हा प्रकल्प असेल. असे त्यांनी मेगा खरेदीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या करारासाठी प्रमुख दावेदारांमध्ये लॉकहीड मार्टिनचे एफ -२१, बोईंगचे एफ/ए -१८, दसॉल्ट एव्हिएशनचे राफेल, युरोफायटर टायफून, रशियन विमान मिग ३५ आणि साबचे ग्रिपन यांचा समावेश आहे.

भारतीय हवाई दल तात्काळ आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त ३६ राफेल विमाने घेणार का? असे विचारले असता, वायुसेना प्रमुखांनी सुचवले की लढाऊ विमान एमआरएफए प्रकल्पाचे दावेदारांपैकी एक असू शकते.

गेल्या वर्षी, तत्कालीन वायुसेना प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी अधिक राफेल विमान खरेदी करण्यास नकार दिला नाही आणि म्हटले की फ्रेंच बनावटीच्या विमानांच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाचा ताफा अधिक सक्षम होणार आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये का सुरु झाला हिंदू-मुसलमान संघर्ष?

पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!

अखेर उघडले दार…

देशभर सुरु आदिशक्तीचा जागर

लष्करी आस्थापनातील काही अधिकाऱ्यांमध्ये असे मत आहे की, भारतीय हवाई दलाने त्याच्या ऑपरेशनल पैलूंचा विचार करून राफेल जेट्सचे किमान चार स्क्वाड्रन असावेत असे सांगितले. भारतीय हवाई दलाच्या एका स्क्वाड्रनमध्ये १८ विमाने असतात. एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले की, “एमआरएफए प्रकल्पाअंतर्गत ११४ जेट्सची खरेदी आणि ८३ लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसचे अधिग्रहण, जॅग्वार मिराजच्या फ्लीट्समधून टप्प्याटप्प्याने बाहेर पडल्यामुळे लढाऊ स्क्वाड्रनच्या संख्येत हळूहळू घट होत असताना आयएएफला लक्षणीय मदत करेल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा