28 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरविशेषअतिककडून जप्त केलेल्या जमिनीवरील घरात मोदींचा थाटात वाढदिवस

अतिककडून जप्त केलेल्या जमिनीवरील घरात मोदींचा थाटात वाढदिवस

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आली घरे

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये दिवंगत कुख्यात माफिया आणि माजी आमदार अतिक अहमदच्या बेकायदा ताब्यात असलेल्या जमिनीवर आता ७६ गरीब कुटुंबांसाठी घरे उभारण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या या ७६ घरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिवे आणि रोषणाई करण्यात येणार आहे.

या घरांमध्ये राहणाऱ्या लाभार्थी कुटुंबांनी घराच्या सजावटीची तयारी केली आहे. दिवे लावून हा दिवस साजरा करण्यात येणार असून, कायमस्वरूपी घर मिळाल्याबद्दल लाभार्थींनी समाधान व्यक्त केले. गरीब कुटुंबांना आता स्वतःच्या घराचे छत मिळाले असून, पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त दिवे लावून आनंद साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिक अहमदच्या कथित बेकायदा ताब्यात असलेली जमीन प्रशासनाने ताब्यात घेतल्यानंतर त्याच ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीबांसाठी घरे बांधण्यात आली. प्रयागराजचे भाजप आमदार आणि माजी मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी या प्रकल्पाचा उल्लेख करत, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना घर देण्याचे काम करण्यात आल्याचे सांगितले. या ७६ लाभार्थ्यांमध्ये मुस्लिम कुटुंबांचाही समावेश असल्याचे सिद्धार्थ नाथ सिंह यांनी सांगितले. लाभार्थींनीच आपल्याशी संपर्क साधून प्रत्येक घरात दिवा लावण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

यूपीआयवरून काँग्रेसमध्येच विरुद्ध दिशेला तोंडे

उपोषण सोडून जरांगेंची मुंबई दौऱ्यातून माघार

“दहशतवादी गुहेत लपून नव्हते, सुरक्षित वातावरणात होते”

सौदी अरेबियाचे F-15 लढाऊ विमान पाडल्याचा हौथींचा दावा

दरम्यान, या प्रकल्पामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरणातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपकडून या प्रकल्पाचा उल्लेख गरीबांना घर मिळाल्याच्या संदर्भात केला जात आहे. दुसरीकडे समाजवादी पक्षाने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते मनोज काका यांनी सरकारने केवळ निवडक प्रकरणांमध्येच भूमाफियांविरोधात कारवाई न करता, उत्तर प्रदेशातील इतर ठिकाणीही कथित भूमाफियांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली. लखनौ, जौनपूर आणि मिर्झापूरसह इतर भागांतील जमीन ताब्यात घेऊन ती गरीबांमध्ये वाटली, तर त्याचे स्वागत करू, असे त्यांनी म्हटले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा