30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषकोरोनाच्या लाटेनंतर आता राज्यात डेंग्यू, चिकनगुनियाची लाट!

कोरोनाच्या लाटेनंतर आता राज्यात डेंग्यू, चिकनगुनियाची लाट!

Google News Follow

Related

कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाला असला तरी राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाने आता डोके वर काढले आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर डेंग्यूचे सर्वाधिक १० मृत्यू हे नागपूरमध्ये झाले असून त्यानंतर चंद्रपूर, वर्धा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात पावसाचे प्रमाण कमी होताच ऑगस्टपासून डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव तुलनेने कमी दिसत होता. परंतु या वर्षी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रभाव पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे.

ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे सुमारे तीन हजार रुग्ण आढळले होते आणि ११ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये मात्र डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून तीन हजार ४०१ रुग्ण नव्याने आढळले आहेत. ऑक्टोबरमध्ये तुलनेने रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अजूनही आजाराचा प्रादुर्भाव फारसा कमी झालेला नाही. ऑक्टोबरच्या २० दिवसांमध्ये डेंग्यूचे एक हजार २५१ रुग्ण नव्याने आढळले आहेत.

२० ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, राज्यात डेंग्यूचे नऊ हजार ५४१ रुग्ण आढळले असून २०१९ च्या तुलनेत या संख्येमध्ये चौपट वाढ झाली आहे. २०१८ साली डेंग्यूची साथ आली होती, तेव्हा वर्षभरात ११ हजार ३८ रुग्ण आढळले होते. तसेच २०१९ आणि २०२० च्या तुलनेत मृत्यूही वाढले असून आतापर्यंत डेंग्यूमुळे २२ मृत्यूंची नोंद आहे. सर्वाधिक मृत्यू विदर्भात झाले असून नागपूर ग्रामीण आणि महानगरपालिकेमध्ये प्रत्येकी पाच, चंद्रपूरमध्ये चार आणि वर्ध्यात तीन जण डेंग्यूमुळे दगावले आहेत. यासह कोल्हापूरमध्ये तीन आणि ठाणे, भंडारा, नगर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

तोंडोळी घटनेतील दोन नराधमांना ठोकल्या बेड्या

इटलीच्या दौऱ्यात पुन्हा मोदी-बायडेन भेट

मुंबई- नाशिक महामार्गावरून जप्त केला ३५.९० किलो गांजा!

३४ मतदारांच्या निवडणुकीत आज शरद पवार-धनंजय शिंदे लढत

गेल्या वर्षी चिकुनगुनियाचे ७८२ रुग्ण आढळले होते. डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या वर्षी चिकुनगुनियांच्या रुग्णांची संख्याही दुपटीहून अधिक वाढून एक हजार ९४७ पर्यंत गेली आहे. २०१८ ला डेंग्यूची साथ आली त्या वेळी वाढलेल्या चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या तुलनेत या वर्षी ऑक्टोबरमध्येच रुग्णांची संख्या जवळपास ९०० ने वाढली आहे.

सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये चिकुनगुनियाचे ४७८ रुग्ण आढळले होते, ऑक्टोबरमध्ये १६८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तुलनेने प्रादुर्भाव कमी झाला आहे, असे राज्य कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र जगताप यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा