30 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरविशेषभारत-इंग्लंड मालिका २-२ बरोबरीत नाही, वाचा सविस्तर...

भारत-इंग्लंड मालिका २-२ बरोबरीत नाही, वाचा सविस्तर…

Related

भारत आणि इंग्लडमधील पाचव्या कसोटी सामन्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मॅन्चेस्टर येथे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आहे. भारत आणि इंग्लंड संघांमधला मॅन्चेस्टरचा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं परस्पर सामंजस्यानं घेतला आहे. तसंच रद्द झालेला पाचवा कसोटी सामना कधी खेळवता येईल, याविषयी दोन्ही बोर्ड चर्चा करून निर्णय घेतील असं बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. त्यामुळं उभय संघांमधल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया २-१ अशी आघाडीवर आहे.

बीसीसीआयने जारी केलेल्या आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, बीसीसीआयने रद्द झालेली कसोटी पुन्हा खेळवण्याचा  इग्लंड क्रिकेट बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला आहे. बीसीसीआय आणि ईसीबीमध्ये सामन्यासंदर्भात  झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने ईसीबी समोर सामना पुढे ढकलण्याचा किंवा सामना रद्द करण्याचे दोन पर्याय दिले होते. त्यानंतर दोन्ही बोर्डाने मॅच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने ईसीबीकडून करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. तसेच चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.

हे ही वाचा:

ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी

भारत-इंग्लंड शेवटचा कसोटी सामना आजपासून

तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा

चमच्याने बोगदा खणून कैदेतून सुटका

भारतीय संघाचे सहाय्यक फिजियो यांना सामन्याच्या एक दिवस अगोदर कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर भारतीय संघाची ट्रेनिंग रद्द करण्यात आली होती.  खबरदारीचा उपाय म्हणून सर्व भारतीय खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यांना हॉटेलमध्ये आयोसोलेट केले आहे. ईसीबीने खबरदारीचा उपाय म्हणून पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रद्द केला. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर होता. दुसरा आणि चौथा कसोटी सामना जिंकत त्यांनी ही आघाडी घेतली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा