29 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरविशेषइंडी आघाडीच्या रॅलीचा व्यापाराला फटका; देशव्यापी ‘धिक्कार दिन’ पाळणार

इंडी आघाडीच्या रॅलीचा व्यापाराला फटका; देशव्यापी ‘धिक्कार दिन’ पाळणार

राहुल गांधींना व्यापारी संघटनेचे पत्र

Google News Follow

राजकीय आंदोलने आणि मोर्चांमुळे दिल्लीतील व्यापार विस्कळीत होत असल्याचा आरोप करत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. आंदोलनांमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, याची राजकीय आणि नैतिक जबाबदारी काँग्रेसने स्वीकारावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिनाभरात दिल्लीमध्ये झालेल्या विविध राजकीय मोर्चे आणि आंदोलनांमुळे बाजारपेठांमधील व्यवहारांवर परिणाम झाला. वाहतुकीतील अडथळे, रस्त्यांवरील निर्बंध आणि ग्राहकांना बाजारपेठांपर्यंत पोहोचताना येणाऱ्या अडचणींमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. विशेषतः सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या खरेदीच्या काळात हा फटका बसला. १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर झालेल्या इंडी आघाडीच्या सभेमुळे परिसरातील दुकाने बंद राहिल्याचा दावाही संघटनेने केला आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन करणारे राहुल गांधी दुसरीकडे व्यापारावर परिणाम करणाऱ्या आंदोलनांना पाठिंबा कसा देतात, असा सवाल त्यांनी केला.

हे ही वाचा:

इराणला तेल निर्यातीत मदत केल्याप्रकरणी भारतीय दाम्पत्यावर निर्बंध

अग्निवीरांचा सेवाकाळ चार वरून सहा वर्षे!

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील ‘एम’ फॅक्टर

ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांचे निधन

पत्रात संविधानातील अनुच्छेद १९(१)(अ) आणि १९(१)(जी) यांचा उल्लेख करण्यात आला आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणेच व्यवसाय करण्याचा अधिकारही महत्त्वाचा आहे. आंदोलनाच्या अधिकारामुळे दुसऱ्याच्या उपजीविकेवर परिणाम होता कामा नये, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. तसेच आंदोलनांमुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना भरपाई कोण देणार, असे पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या उत्तराची प्रतीक्षा केल्यानंतर दिवाळीनंतर दिल्लीत व्यापारी नेत्यांची राष्ट्रीय बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. तसेच देशभरात ‘धिक्कार दिन’ पाळण्याची घोषणाही कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा