पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्या उपस्थितीत बुधवारी आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे करार गुन्हे तपास, सागरी वाहतूक देखरेख, पायाभूत सुविधा कूटनीती, व्यापार, क्षमता निर्माण, वित्त आणि महासागर अर्थव्यवस्था यांसारख्या अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत. संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील दृढ संबंधांवर प्रकाश टाकला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आणि मॉरिशस यांचे नाते केवळ हिंद महासागरामुळे जोडले गेलेले नाही, तर आपल्या सामायिक सांस्कृतिक परंपरा आणि मूल्यांमुळेही दृढ आहे. आम्ही एकमेकांचे नैसर्गिक भागीदार आहोत – नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोविड संकट, संरक्षण असो किंवा शिक्षण, आरोग्य असो किंवा अंतराळ क्षेत्र, आम्ही प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून पुढे जात आहोत. गेल्या दहा वर्षांत आपण आपल्या संबंधांमध्ये अनेक नवीन पैलू जोडले आहेत.”
हेही वाचा..
महू हिंसाचार: आठ गुन्हे दाखल, ५० जण आरोपी म्हणून घोषित तर १० जणांची रवानगी तुरुंगात
पाकिस्तानी झेंडा असलेला फुगा सापडल्याने खळबळ
बुमराहला पुन्हा तीच दुखापत झाली, तर धोकादायक!
मध्य प्रदेशच्या चंबळ खोऱ्यात आता डाकुंची पैदास संपली, होणार शेती !
पंतप्रधान मोदींनी बुधवारी घोषणा केली की भारत मॉरिशससाठी नवीन संसद भवन उभारण्यात सहकार्य करेल. त्यांनी सांगितले की ही इमारत ‘मदर ऑफ डेमोक्रेसी’ (लोकशाहीची जननी) भारताकडून मॉरिशसला भेट असेल. पुढील पाच वर्षांत मॉरिशसच्या ५०० सिव्हिल सर्व्हंटना (नागरी सेवक) भारतात प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणाही मोदींनी केली. तसेच, स्थानिक चलनात परस्पर व्यापाराच्या सेटलमेंटबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.
पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या नागरिकांना त्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की हे माझ्यासाठी भाग्याचे आहे की मला पुन्हा मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनी येथे येण्याचा सन्मान मिळाला. त्यांनी यासाठी पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम आणि मॉरिशस सरकारचे आभार मानले. पंतप्रधान मोदी ११-१२ मार्च दरम्यान मॉरिशसच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत.