31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषविराट, सूर्याचे रॉकेट, राहुलचा फुसका बार तर रोहितची आतषबाजी

विराट, सूर्याचे रॉकेट, राहुलचा फुसका बार तर रोहितची आतषबाजी

भारताने नेदरलँड्सवर केली सहज मात

Google News Follow

Related

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. नेदरलँड्सवर भारताने ५६ धावांनी दणदणीत मात केली. हा सामना तसा एकतर्फी असला तरी त्यातील काही महत्त्वाच्या घटनांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. रोहितने युवराजचा विक्रम याच सामन्यात मोडित काढला तर सलामीवीर केएल राहुलला फॉर्म अजूनही गवसत नसल्याचे दिसून आले. शेवटच्या ५ षटकांत भारतीय फलंदाजांनी धुवाँधार फलंदाजी करून दाखविली आणि लोकांच्या टाळ्या मिळविल्या तर पाकिस्तानविरुद्ध चमकलेला वेगवान गोलंदाज अर्शदीपची हॅट्रिक हुकली.

हे महत्त्वाचे क्षण कोणते ते जाणून घेऊ-

केएल राहुलचा फ्लॉप शो सुरुच

पाकविरुद्ध अवघ्या ४ धावांवर बाद झालेल्या केएल राहुलची गाडी नेदरलँडविरुद्धही अपयशी ठरली. मीकरेनने तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर राहुलला फ्लिक करण्याचा मोह आवरला नाही. आत येणाऱ्या चेंडूने राहुल पायचीत झाला. मात्र राहुल नाबाद होता. चेंडू लेग-स्टंपला मिस करत असल्याचे रिप्लेवरून स्पष्ट दिसत होते. परंतु दुसऱ्या टोकाला असलेल्या कर्णधार रोहित शर्माने डीआरएस घेण्यास नकार दिला. राहुलला स्वस्तात माघारी परतावे लागले. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याआधी आपल्या खेळाडूंना खेळ सुधारा अशी तंबी देण्यात आली होती. लागोपाठ दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या राहुलला पुढील सामन्यात संधी मिळेल का हे आता पाहावं लागेल.

रोहितने मोडला युवराजचा सिंगचा विक्रम

रोहित शर्माने ५३ धावांच्या खेळीदरम्यान ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले. रोहितने टी२० वर्ल्ड कपमध्ये ३४ षटकार मारून युवराज सिंगचा विक्रम मोडला. युवराजने ३३ षटकार ठोकण्याचा विक्रम टी-२० वर्ल्डकपमध्ये केला होता. पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितचा सोपा झेल प्रिंगलने सोडला. आज नेदरलँडचे खेळाडू जणू रोहितवर मेहरबान होते. त्याचे उडालेले सोपे झेल नेदरलँडचे खेळाडू एक टप्पा पकडत होते. ख्रिस गेलने टी-२० वर्ल्डकपमध्ये ६३ षटकार खेचण्याचा पराक्रम केलेला आहे.

शेवटच्या ५ षटकात टीम इंडियाने कुटल्या ६५ धावा

टीम इंडियाच्या फलंदाजांना सुरुवातीला डच गोलंदाजांनी जखडून ठेवले होते. पॉवरप्लेच्या ६ षटकात टीम इंडियाला अवघ्या ३८ धावा करता आल्या. राहुल स्वस्तात माघारी परतला होता. दहाव्या षटकापर्यंत ६७ धावा, पंधराव्या षटकापर्यंत ११४ धावांपर्यंत टीम इंडिया मजल मारू शकला होता. पंधराव्या षटकानंतर टीम इंडियाची गाडी सुसाट सुटून ६५ धावा त्यांनी झोडपून काढल्या. नेदरलँड्सकडून फ्रेड क्लासेन आणि पॉल वॉन मेकर्न यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

अर्शदीपची हॅटट्रिक हुकली

अठराव्या शतकातील पाचव्या चेंडूवर वॅन बिक तर सहाव्या चेंडूवर फ्रेड क्लॅसेनला अर्शदीपने आपल्या जाळ्यात पकडले. लेग स्टम्पचा वेध घेत असलेल्या चेंडूला अम्पायरने नाबाद दिले. डिआरएस घेतल्यानंतर टीव्ही अम्पायरने तो बाद असल्याचा निर्णय दिला.

हे ही वाचा:

सपा आमदार आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा

संरक्षण मंत्र्यांचा पाकव्याप्त काश्मीरबाबत पुन्हा एकदा अल्टिमेटम

अकासा एअरचे विमान १९०० फूट उंचीवर पक्ष्याला धडकले

महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयची दिवाळीभेट, आता पुरुषांएवढेच मानधन

 

अश्विनने एका षटकात दोघांना माघारी धाडले

तेराव्या षटकात नेदरलँडला रविचंद्रन अश्विनने नेदरलँडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कॉलिन अकरमनला झेलबाद केले. त्यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर टॉम कूपरला झेलबाद केले.

सामन्यात काय घडले?

पाकिस्तानला धूळ चारून सुरू केलेली घोडदौड टीम इंडियाने सुरूच ठेवलीय. टी२० विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा ५६ धावांनी दणदणीत पराभव करून त्यांना धूळ चारलीय. नाणेफेक कौल जिंकल्यानंत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. टीम इंडियाच्या तीन फलंदाजांनी धडाकेबाज अर्धशतके झळकावली.

टीम इंडियाचा कट्टर शत्रू पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरलेला विराट कोहली या सामन्यातही चमकला. त्याने ४४ चेंडूत नाबाद ६२ धावा चोपून काढल्या. विराटचे टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे ३५ वे अर्धशतक आणि या विश्वचषकातील सलग दुसरे अर्धशतक. पाकविरुद्धच्या सामन्यात ८२ नावाद धावांची विराट खेळी करून पाकच्या तोंडातील घास त्याने हिरावून घेतला होता.

सलामीवीर रोहित शर्माने ३९ चेंडूत ५३ धावा करत २९ वे अर्धशतक झळकावले. तर सूर्याने २५ चेंडूत ५१ धावा करून नेदरलँडच्या गोलंदाजांना होरपळून काढले. त्याने विसाव्या शतकातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या ५० धावा पूर्ण केल्या. भारतीय संघाने २० षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावा केल्या. भारताने शेवटच्या पाच षटकात ६५ धावांचा पाऊस पाडला. प्रत्युतरादाखल नेदरलँडने ९ गड्याच्या मोबदल्यात १२३ धावा केल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा