28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामासपा आमदार आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा

सपा आमदार आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा

Google News Follow

Related

समाजवादी पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री आझम खान यांना गुरुवार,२७ ऑक्टोबर रोजी मोठा झटका बसला आहे. आझम खान यांना गुरुवारी न्यायालयाने शिक्षा तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हेट स्पीच प्रकरणी ही शिक्षा ठोठवण्यात आली आहे. या शिक्षेनंतर आझम खान यांच्या आमदारकीवरही टांगती तलवार असल्याचं म्हटलं जातं आहे.

आझम खान हे रामपूरमधून दहा वेळा आमदार राहिले आहेत आणि सपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. आझम खान यांना झालेली शिक्षा हा त्यांच्यासाठीच नव्हे तर समाजवादी पक्षासाठीही मोठा धक्का मानला जात आहे.आझम खान हे अखिलेश यादव यांच्यानंतर सपातील सर्वात दिग्गज नेते मानले जातात.

आझम खान यांच्याविरुद्ध तीन कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तिन्ही प्रकरणात ते दोषी आढळले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी आझम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आझम खान यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. याशिवाय अन्य आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. जुलै २०१९ ला भाजपा नेते आकाश सक्सेना यांनी आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तिन्ही आरोपांमध्ये खान दोषी आढळल्याने आज त्यांना न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

देशात उघडली ४८ लाख डिमॅट खाती

सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्या आता २४ तास

चित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले

शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन

२०१९ च्या निवडणुक प्रचारादरम्यान त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांचा आणि तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. धमकावून दंगल भडकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विशिष्ट वर्गाला धर्माच्या नावावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या आरोपांसह, व्हिडिओ निरीक्षण पथकाचे प्रभारी अनिल कुमार चौहान यांच्या वतीने आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा