31 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरविशेषभारतीय हवाई दलाच्या 'गजराज' चे १३ हजार फुटांवर लँडिंग

भारतीय हवाई दलाच्या ‘गजराज’ चे १३ हजार फुटांवर लँडिंग

चीन सीमेपासून २३ किमी अंतरावर कामगिरी

Google News Follow

भारतीय हवाई दलाने लडाखमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सुमारे १३,००० फूट उंचीवर असलेल्या न्योमा हवाई तळावर आयएल-७६एमडी विमानाने यशस्वी लँडिंग केले आहे. हवाई दलाच्या माहितीनुसार, या विमानाचे जगातील सर्वात उंच ठिकाणी झालेले लँडिंग आहे. न्योमा हवाई तळ सुमारे १३,००० फूट उंचीवर आणि चीनच्या सीमेपासून (LAC) फक्त २५ किलोमीटर अंतरावर आहे.

“भारतीय हवाई दलाच्या आयएल-७६एमडी विमानाने न्योमा येथे यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला आहे. जगभरात या विमानाने केलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक उंचीवरील लँडिंग आहे,” असे हवाई दलाने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. आयएल-७६एमडी हे रशियन बनावटीचे चार इंजिन असलेले मालवाहू विमान असून आहे. भारतीय हवाई दलाकडून सैन्य, लष्करी उपकरणे आणि अत्यावश्यक सामग्रीच्या वाहतुकीसाठी याचा वापर केला जातो.

आतापर्यंत या तळावर ‘सी-१३०जे’ आणि ‘एएन-३२’ सारखी लहान मालवाहू विमाने हाताळली जात होती. आता ‘आयएल-७६’ सारख्या मोठ्या विमानाचे येथे उतरणे हे दर्शवते की, न्योमा एअरबेस भारताच्या जड मालवाहू विमानांनाही हाताळण्यास सक्षम आहे. या विमानांच्या मदतीने एकाच फेरीत पूर्व लडाखमध्ये मोठ्या संख्येने सैनिक आणि लष्करी साहित्याची ने-आण करणे शक्य होणार आहे. चीनसोबत २०२० मध्ये झालेल्या सीमा संघर्षांपासून, भारतीय हवाई दल या प्रदेशात तैनात असलेल्या हजारो सैनिकांना रसद पुरवण्यासाठी हवाई वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, विशेषतः हिवाळ्यात, जेव्हा बर्फामुळे डोंगराळ रस्ते बंद होतात.

हे ही वाचा:

अरुणाचल प्रदेशात ४५८ एकरवरील गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त

कर्नाटकात आलेल्या केरळमच्या बसवर दाऊदचा उदोउदो!

बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

आयएल-७६ (Il-76) हे विमान १९८० च्या दशकाच्या मध्यापासून भारतीय हवाई दलात कार्यरत आहे. ते ‘गजराज’ या नावाने ओळखले जाते. हवाई दल हे विमान अमेरिकानिर्मित सी-१७ ग्लोबमास्टर III (C-17 Globemaster III) आणि सी-१३०जे (C-130J) या विमानांसोबत वापरते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा