34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरविशेषस्पॅम कॉल्सवरून भारत सरकारने दिला व्हॉट्सअपला दिला इशारा

स्पॅम कॉल्सवरून भारत सरकारने दिला व्हॉट्सअपला दिला इशारा

व्हॉट्सऍपवर अज्ञात आंतरराष्ट्रीय नंबरवरून (स्पॅम कॉल) कॉल येण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास

Google News Follow

Related

मेटाच्या मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपवर अज्ञात आंतरराष्ट्रीय नंबरवरून (स्पॅम कॉल) कॉल येण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक तक्रारीनंतर केंद्र सरकारने व्हॉट्सअप विरोधात पावलं उचण्याचा तयारी दर्शवली होती.

व्हॉट्सअपवर सध्या स्पॅम कॉल्स मोठ्या प्रमाणात येत असून हे कॉल्स आफ्रिकन आणि आग्नेय आशियाई देशांमधील आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येत आहेत. अनेक व्हॉट्सअप वापरकर्त्यांनी ट्विटरवर त्यांच्या तक्रारी मांडल्यानंतर या घटना उघडकीस आल्या.

इंटरनॅशनल स्कॅम कॉल्सवर भारत सरकारच्या प्रतिक्रियेनंतर व्हॉट्सअप करून सांगण्यात आले की, “वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता संरक्षित करणे हे मेटा आणि व्हॉट्सअपसाठी अत्यंत मूलभूत आहे. आमचे वापरकर्ते हे आमच्यासाठी केंद्रस्थानी आहेत. वापरकर्त्यांच्या सुरक्षेचे संरक्षण करण्यासाठी एंड-टू-एंड एनक्रिप्टेड सेवांमध्ये व्हॉट्सअप आघाडीवर आहे. तसेच ब्लॉक आणि रिपोर्ट सारखी अनेक सुरक्षा साधने प्रदान करण्यात आली आहेत. मात्र, फसवणूक करण्याचे नवनवीन मार्ग शोधले जातात आणि स्पॅम कॉल्स हा त्यातलाच एक प्रकार आहे. या घटना कमी करण्यासाठी आम्ही आमच्या AI आणि ML प्रणाली अधिक सक्रिय केल्या असून यामुळे स्पॅम कॉल्स ५० टक्के कमी होतील अशी अपेक्षा आहे.”

हे ही वाचा:

डी – कंपनी एनआयएच्या रडारवर 

शिक्षकांनी लावला डोक्याला हात, उत्तर पत्रिकेत ‘पुष्पा’चे संवाद

रक्ताच्या पिशव्या गरजूंपर्यंत उडत गेल्या!

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, हे न्यायालयाचे मत महत्त्वाचे!

भारत सरकारने व्हॉट्सअपला कारवाईचा इशारा देताच व्हॉट्सअपकडून त्वरित हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे आता येणारे स्पॅम कॉल्स कमी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा