34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषइस्रोचा ‘नाविक’ उपग्रह अवकाशात झेपावला

इस्रोचा ‘नाविक’ उपग्रह अवकाशात झेपावला

जीपीएसप्रमाणे कार्य करणारा हा उपग्रह असून भारताच्या भूमीपासून १५०० किलोमीटरच्या परिसरात तो सेवारत असेल.

Google News Follow

Related

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आपल्या नाविक मालिकेतील आणखी एक उपग्रह आकाशात सोडला आहे. २२३२ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह अवकाशात झेपावला तो २०२३मधील इस्रोने सोडलेला पाचवा उपग्रह आहे.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून या उपग्रहाला आकाशात सोडण्यात आले. देशाच्या क्षमतांचा ठसा उमटविणाऱ्या नाविक मालिकेतील हा पहिला उपग्रह आहे. लष्कराला बळकट करण्यासाठी तसेच नौदल सेवांच्या देखरेखीसाठी या उपग्रहाचे महत्त्व आहे. भारताच्या आपल्या उपग्रहामुळे संरक्षण दलाची ताकद आणखी वाढणार आहे.

जवळपास २० मिनिटांचा प्रवास केल्यानंतर २५१ किलोमीटरवर भूसमकालिक कक्षेत हा स्थिरावणार आहे.

हे ही वाचा:

मोदींची झळाळी आणि अपशकुनी दिवाभीतांचे टोळके…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘संग्रहालयांची बात’

‘चालण्यासाठी वापरली जाणारी काठी म्हणून सेंगोलचा वापर झाला होता’!

म्हणून गरज होती नव्या संसद भवनाची !…माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले कारण

जीपीएसप्रमाणे कार्य करणारा हा उपग्रह असून भारताच्या भूमीपासून १५०० किलोमीटरच्या परिसरात तो सेवारत असेल. याचा उपयोग जमिनीवरील, हवाई तसेच पाण्यातील परिवहनासाठी होऊ शकतो. लोकेशन संदर्भातील सेवाही हा उपलब्ध करून देईल. विविध साधनसामुग्रीवर देखरेख करण्याचे कामही या उपग्रहाच्या माध्यमातून करता येईल. आता हा उपग्रह अमेरिकेच्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम सिग्नल, जीपीएस, रशियाची ग्लोनास, युरोपिय संघाची गॅलिलिओ आणि चीनची बेईदोऊ यांच्यासमवेत काम करू शकेल.

सोमवारी प्रक्षेपित झालेल्या या उपग्रहाची उलटगणती रविवारी सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी सुरू झाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा