27.4 C
Mumbai
Sunday, July 13, 2025
घरविशेषभरोसा सार्थ ठरवला! जायसवाल-गिलच्या खेळीने सचिनही झाले प्रभावित

भरोसा सार्थ ठरवला! जायसवाल-गिलच्या खेळीने सचिनही झाले प्रभावित

Google News Follow

Related

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत यशस्वी जायसवाल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी भक्कम कामगिरी करत दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांचंही मन जिंकलं आहे. एजबेस्टनच्या मैदानावर जायसवालने ८७ धावांची दमदार खेळी साकारली, तर गिलने दिवसअखेर ११४ धावांवर नाबाद खेळ करत संघाला ३१० धावांपर्यंत पोहोचवलं.

सचिन तेंडुलकर यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर दोघांची स्तुती करत लिहिलं –
“जायसवालने पहिल्याच चेंडूपासून लय पकडली. तो सकारात्मक, निडर आणि हुशारीने आक्रमक होता. गिल शांत, दडपणात स्थिर आणि पूर्ण नियंत्रणात होता. दोघांची फलंदाजी अतिशय दर्जेदार होती. छान खेळलात, मुलांनो!”

दुसऱ्या बाजूला, जायसवालनेही गिलच्या खेळीचं कौतुक करत म्हटलं –
“गिल ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, ती अविश्वसनीय आहे. ते एक उत्तम कर्णधार आहेत. त्यांना टीमसाठी काय करायचंय हे स्पष्ट आहे आणि आम्हालाही आमच्या कामावर पूर्ण विश्वास आहे.”

त्याने पुढे असंही सांगितलं की,
“सर्वजण फलंदाजीचा आनंद घेत आहेत. आम्ही सगळे एकाच मानसिकतेने मैदानात उतरतो आहोत – सामना खोलवर घेऊन जाण्याच्या तयारीत.”

इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाज क्रिस वोक्स यांनीसुद्धा गिलच्या संयमी खेळीचं कौतुक करत म्हटलं –
“एका क्षणी असं वाटलं की आम्ही त्यांना एलबीडब्ल्यू करू शकतो, पण त्यानंतर त्यांनी सामना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला. हा शतक त्यांच्या संघासाठी खूप महत्त्वाचं ठरेल.”

पहिल्या दिवशी भारताने ५ बाद ३१० धावा केल्या आहेत. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करताना भारताला १५ धावांवर पहिला धक्का बसला, पण त्यानंतर जायसवालने डाव सावरण्याची जबाबदारी घेतली. त्याने १३ चौकारांच्या मदतीने १०७ चेंडूंमध्ये ८७ धावा केल्या. त्यांच्या बाद झाल्यानंतर गिलने आपल्या शतकी खेळीनं संघाला मजबुती दिली. जडेजा ४४ धावांवर नाबाद आहेत.

इंग्लंडकडून क्रिस वोक्स यांनी सर्वाधिक २ गडी बाद केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा