भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंघम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलने पुन्हा एकदा आपली चमक दाखवत सलग दुसऱ्या सामन्यात शतक ठोकले आहे. पहिल्या दिवसाखेरीस भारताने ५ बाद ३१० धावा केल्या असून गिल ११४ धावांवर नाबाद आहेत.
ही गिलची इंग्लंड दौऱ्यात सलग दुसऱ्या कसोटीतली शतकी खेळी ठरली आहे. यापूर्वी लीड्स कसोटीत त्यांनी १४७ धावांची खेळी केली होती.
यासोबतच, शुभमन गिल २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (सर्व फॉर्मेट मिळून) चार शतक झळकावणारा एकमेव फलंदाज ठरला आहे.
गिलने यंदा फेब्रुवारी महिन्यात दोन एकदिवसीय शतकं झळकावली होती —
१२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध ११२ धावा आणि २० फेब्रुवारीला दुबईत बांगलादेशविरुद्ध नाबाद १०१ धावा.
गिलने जुलै २०२४ नंतर टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलेलं नाही.
या यादीत शुभमन गिलच्या पाठोपाठ वेस्ट इंडीजचा कीसी कार्टी आणि इंग्लंडचा बेन डकेट संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. या दोघांनी यावर्षी तीन-तीन शतकं झळकावली आहेत.
