पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी इटलीतील रोम येथे असलेल्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) मुख्यालयात आयोजित समारंभात वर्ष २०२६ चा ‘एग्रीकोला मेडल’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. एफएओचे महासंचालक क्यू डोंग्यू यांनी ऐतिहासिक एफएओ प्लेनरी हॉलमध्ये पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला. अन्नसुरक्षा, कृषी विकास आणि शेतकरी कल्याणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आल्याचे संघटनेने सांगितले.
पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करताना क्यू डोंग्यू म्हणाले की, कृषी उत्पादनवाढ, अन्नसुरक्षा मजबूत करणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान मोदींची असलेली बांधिलकी या सन्मानातून अधोरेखित होते. भूक आणि गरिबीविरोधातील लढा, सार्वत्रिक अन्नसुरक्षेला चालना आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एफएओ करत असलेल्या प्रयत्नांमध्ये भारताने दिलेल्या सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले. शेतकरी-केंद्रित आणि तंत्रज्ञानाधारित योजनांच्या माध्यमातून भारताच्या कृषी व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाची एफएओ प्रमुखांनी प्रशंसा केली.
भारताच्या मोठ्या अन्न व कृषी योजनांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, कोविड-१९ महामारीनंतर सुमारे ८० कोटी लोकांना अन्नसहाय्य देण्यात आले, तर ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पोहोचवण्यात आली. क्यू डोंग्यू यांनी नैसर्गिक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले. एफएओच्या सहकार्याने ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षा’च्या माध्यमातून पौष्टिक भरडधान्यांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या पुढाकाराचे त्यांनी विशेष स्वागत केले.
हे ही वाचा
अभिषेक बॅनर्जींच्या मालमत्तांना नोटिसा आणि तृणमूल नगरसेवकाचा अध्यक्षपदाचा राजीनामा
“नरसंहाराचा इतिहास असलेल्या राष्ट्राने काश्मीरवर व्याख्यान देणे हा विरोधाभास”
पासपोर्ट पडताळणीसाठी लाचेची मागणी
जनादेश बुलडोझरसाठीच होता, माय लॉर्ड
जी-२० अध्यक्षपदाच्या काळात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर भारताने दिलेल्या भरालाही त्यांनी महत्त्वपूर्ण म्हटले. त्यांच्या मते, त्यामुळे विकसनशील देशांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढली आणि सेवा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले. एफएओ प्रमुखांनी सांगितले की, या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारतातील लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात मोठी मदत झाली आहे.







