33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरविशेषजेईई परीक्षा तूर्तास स्थगित

जेईई परीक्षा तूर्तास स्थगित

Google News Follow

Related

कोविडचा प्रादुर्भाव पाहता जेईई परीक्षा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा  २७, २८ आणि ३० एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. परंतु, आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजंसीने दिलेल्या माहितीनुसार, जेईई परीक्षांच्या नव्या तारखेची घोषणा परीक्षेच्या कमीत कमी १५ दिवस आधी करण्यात येईल.

कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेता देशभरात अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या असून काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारवीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता  एप्रिलमध्ये होणारी परीक्षा जेईईची मुख्य परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, देशभरातील जवळपास ६ लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी बसणार होते. मार्चच्या अटेम्पटमध्ये परीक्षेत ६,१९,६३८ विद्यार्थी सहभागी झाले होते. तर फेब्रुवारीच्या अटेम्पटमध्ये ६.५२ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना फक्त वसुलीच कळते

दुपारी मंत्री दम देतात, संध्याकाळी अटक होते

लस उत्पादनासाठी संपूर्ण क्षमता वापरा

शिवसेना नेत्याने पुन्हा पातळी सोडली

दरम्यान, जेईईची मुख्य परीक्षा,  बीई, बीटेकसह आयआयआयटी, एनआयटी आणि इतर अनके अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा देशभरातून अनेक विद्यार्थी देतात. जे विद्यार्थी जेईईची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतात आणि २.५ क्रमांकापर्यंत येतात. त्यांना आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई ऍडव्हान्स प्रवेश परीक्षेसाठी निवडलं जातं. गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा