31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरविशेष'जोधा अकबर'चा सेट भस्मसात

‘जोधा अकबर’चा सेट भस्मसात

Google News Follow

Related

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमधील सेटला आग लागली. एनडी स्टुडिओमधील ‘जोधा अकबर’ चित्रपटासाठी बनवण्यात आलेला किल्ल्याचा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील चौक येथून कर्जत कडे जाणाऱ्या मार्गावर नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ आहे. या ठिकाणी शूटिंगसाठी उभारण्यात आलेल्या किल्ल्याच्या पाठीमागे आग लागून सेट जळाला. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने धुरांचे लोट तीन ते चार किलोमीटर अंतरावरुनही दिसत होते.

कर्जत नगरपालिकेचे अग्नी शमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होत्या.

एनडी स्टुडिओच्या पाठीमागील बाजूला मोठ्या प्रमाणात सुकलेले गवत वणव्यामुळे पेटले. त्याची वेळीच दखल न घेतल्याने स्टुडिओच्या आतील भागातील गवत जळत जोधा अकबर चित्रपटासाठी बनवलेल्या किल्ल्याच्या सेटपर्यंत आग पोहोचली. आणि त्यात सेटच्या काही भागाला आग लागली. यामध्ये अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

हे ही वाचा:

‘विरूष्का’कडून कोरोनाबाधितांना दोन कोटींची मदत

उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट होते- संजय काकडे

ठाकरे सरकारच्या घपल्याचा ‘मनोरा’ ३०० कोटींचा

मोदींनी पुन्हा घेतली कोरोनाची आढावा बैठक

प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘जोधा अकबर’ हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेता हृतिक रोशन यामध्ये अकबराच्या तर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोधाबाईंच्या मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा