दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याबाबत लवकरच खुलासा होणार आहेत. भाजपाच्या १९ फेब्रुवारीच्या बैठकीनंतर नावाची घोषणा करण्यात येणार आहे. तर २० फेब्रुवारी रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्यास होणाऱ्या विलंबावरून कार्यवाहक मुख्यमंत्री आतिशी आणि आम आदमी पक्ष भाजपवर सतत निशाणा साधत आहेत. त्याचवेळी, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आता आम आदमी पक्षावर मोठा हल्ला चढवला आहे. दिल्लीतील नवीन मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर केजरीवाल, सिसोदिया आणि आतिशी यांना दररोज न्यायालयात जावे लागेल, असा इशारा वीरेंद्र सचदेवा यांनी दिला आहे.
दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, “दिल्लीचे कार्यवाहक मुख्यमंत्री आतिशी विचारत आहेत की मुख्यमंत्री कोण आहे? ५ महिने आपचे मुख्यमंत्री तुरुंगात होते, त्यावेळी मुख्यमंत्री कोण आहेत हे तुम्ही (आप) सांगितले का? आतिशी यांच्याकडे आता सांगण्यासाठी काहीच उरले नाही. ते पुढे म्हणाले, तुम्ही (आतिशी) योगायोगाने आमदार झालात. पण तुमच्याच पक्षाचे लोक तुम्हाला विरोधी पक्षनेते म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत.”
हे ही वाचा :
घरगुती वादातून पित्याने ३ महिन्याच्या मुलीला जमिनीवर आपटले
पूर्व उपनगरातून ७ सराईत गुन्हेगार हद्दपार
नियाज खान म्हणतात, इस्लाम अरब देशातला, भारतातील हिंदू मुस्लिमांचा डीएनए एकच!
अमृता पुजारी, विजय चौधरीने गाजवले वर्चस्व; जामनेरमध्ये कुस्तीचा फड
ते पुढे म्हणाले, आतीशी यांच्याकडे बोलण्यासाठी काहीही उरलेले नाही. खोटे बोलणे आणि निराधार आरोप करणे हे आतिशीच्या वंशात आहे. आम आदमी पक्ष, गोपाल राय, संजीव झा आणि पक्षाचे इतर अनेक वरिष्ठ नेते तुम्हाला त्यांचे नेते म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत.
“जेव्हा भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर येईल आणि सरकार स्थापन होईल, तेव्हा आतिशी, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याकडे इतके काम असेल कि त्यांना डोके खाजवायलाही वेळ मिळणार नाही. ते पुढे म्हणाले, तुम्हाला दररोज न्यायालयात जावे लागेल. तुम्ही केलेली चोरी आणि लोकांची केलेली फसवणूक यांची उत्तरे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे यासाठी तुम्ही तुमची उर्जा वाचवून ठेवा, निरुपयोगी गोष्टींवर वाया घालवू नका, असे वीरेंद्र सचदेवा म्हणाले.
#WATCH | Delhi BJP President Virendraa Sachdeva says "When the face of the Chief Minister of BJP comes, and the government is formed, Atishi, Arvind Kejriwal, and Manish Sisodia will have so much work that you will not be able to find time to scratch your head. You have to go to… pic.twitter.com/xJFyXb3lH8
— ANI (@ANI) February 17, 2025