शहरातील पूर्व उपनगरातून सात सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे, यापैकी तीन जण मुलुंड तर भांडुप, पंतनगर, कांजूरमार्ग आणि पार्कसाईट पोलीस ठाण्यातून प्रत्येकी एक असे एकूण सात जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ नुसार कारवाई करून त्यांना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून हद्दपार करण्यात आले आहे.
गिरीश गंगाधर शिंदे (२५),शाहुल हमीद सय्यद (३७), अशोक गौतम गायकवाड उर्फ दांदया (३३), लक्ष्मण शंकर पवार (३२), जितू दिनेश शर्मा (२७),लखन लल्लूराम गौड (२५) आणि वैभव सचिन खताळ(२१) असे हद्दपार करण्यात आलेल्या सात गुन्हेगारांची नावे आहेत. गिरीश हा घाटकोपर पूर्व पंतनगर, शाहुल याला पार्कसाईट विक्रोळी पश्चिम, अशोक गायकवाड याला भांडुप पश्चिम लक्ष्मण,जितू आणि वैभव यांना मुलुंड पश्चिम आणि लखन याला कांजूरमार्ग पोलीस ठाण्याने हद्दपार केले आहे.
हे ही वाचा:
भास्कर जाधव उद्धव ठाकरेंच्या हुकुमशाहीत अडकलेत!
अमृता पुजारी, विजय चौधरीने गाजवले वर्चस्व; जामनेरमध्ये कुस्तीचा फड
महाकुंभच्या सेक्टर ८ मधील कॅम्पमध्ये लागली आग!
लष्कर-ए-तोयबाच्या वरिष्ठ कमांडरची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या
हद्दपार करण्यात आलेल्या सात ही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून परिसरात सामान्य नागरिकांना त्रास देणे, लुटणे,मारहाण करणे, दुकांदाराकडून खंडणी वसूली करून लोकांमध्ये या आरोपीनी दहशत निर्माण केली होती, त्यांच्या दहशतीमुळे स्थानिक त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी कुणाचे धाडस होत नव्हते.
दरम्यान परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी याची दखल घेत,परिमंडळ सात मधील या सात सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या सातही जणांना मुंबई,ठाणे आणि नवीमुंबईतून हद्दपार करण्यात आले आहे. या गुन्हेगाराच्या हद्दीपारीमुळे नागरीकानी सुटकेचा निश्वास टाकला आहे.