माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. याच दरम्यान, भास्कर जाधव देखील नाराज असल्याचे समोर आले होते. माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, असे वक्तव्य करत भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे भास्कर जाधव देखील महायुतीत जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरु झाली होती. भास्कर जाधवांच्या नाराजीवर शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘भास्कर जाधव उद्धव ठाकरेंच्या हुकुमशाहीत अडकले’ आहेत, असे शहाजीबापू म्हणाले आहेत.
शहाजीबापू म्हणाले, भास्कर जाधवांची भाषणे ऐकत असताना मला सुद्धा प्रामाणिकपणाने जाणवत होते कि एवढा प्रभावी पणाने बोलणारा मुद्देसुर कायद्याने परफेक्ट भाषण करणारा हा माणूस विनाकारण उद्धव ठाकरेंच्या हुकुमशाहीच्या प्रवृत्तीच्या माणसाजवळ अडकलेला आहे. अजूनही भास्कर जाधवांनी चांगला निर्णय घेतला आणि तिथून जर बाजूला गेले तर त्यांच्या नेतृत्वाला अजूनही भरपूर संधी मिळेल असे त्यांचे वय आहे, असे बापू पाटील म्हणाले.
हे ही वाचा :
अमृता पुजारी, विजय चौधरीने गाजवले वर्चस्व; जामनेरमध्ये कुस्तीचा फड
मराठी साहित्य संमेलन गीताचे राजभवनमध्ये उद्घाटन
महाकुंभच्या सेक्टर ८ मधील कॅम्पमध्ये लागली आग!
राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावर त्यांनी भाष्य केलं. शहाजी बापू पाटील म्हणाले, चौकशीमुळे कोणीही पक्षात येत नसते. छगन भुजबळ, संजय राऊत यांचीही चौकशी झाली मग त्यांनी पक्ष सोडला का?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तवता परिस्थिती अशी झाली आहे कि ‘शिवसेनेत थांबण्यात काही अर्थ’ नाही. एक दिवस असा उगेवले तेव्हा आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा बोलतील.