मध्य प्रदेश केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी नियाज खान यांनी स्पष्टपणे सांगितले की इस्लाम हा अरब धर्म आहे आणि भारतातील प्रत्येकजण हिंदू आहे. आयएएस अधिकारी नियाज खान हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात आणि पुन्हा एकदा ते त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी म्हटले आहे की इस्लाम अरब देशांमधून येथे आला आहे, म्हणून देशातील मुस्लिमांनी प्रथम हिंदूंना त्यांचे भाऊ म्हणून स्वीकारावे आणि नंतर अरब देशांना स्वीकारावे.
नियाज खान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की, “इस्लाम हा अरबस्तानचा धर्म आहे, येथे सर्वजण हिंदू होते. हिंदूंमधील लोकांचे मुस्लिमात रूपांतर झाले. म्हणून धर्म वेगवेगळे असले तरी रक्त एकच आहे. सर्व एकाच संस्कृतीचा भाग राहिले आहेत. जर मुस्लिम अरबांना आदर्श मानत असतील तर त्यांनी पुनर्विचार करावा. “आधी हिंदूंना तुमचे भाऊ समजा, नंतर अरबांना.”
दरम्यान, आयएएस अधिकाऱ्याच्या वक्तव्यामुळे त्यांना मुस्लिम बाजूने बरीच टीका सहन करावी लागत आहे. मुस्लीम समाजाकडून त्यांना लक्ष करण्यात येत आहे. एकाने सोशल मीडियावर असा युक्तिवाद केला की ‘जर इस्लामचा उगम अरबस्तानात झाला असेल तर भारतीय मुस्लिम का आहेत?’. आणखी एकाने विचारले की, “चला, काही तर्क सांगा, जर इस्लाम हा अरबस्तानचा धर्म आहे, तर तुमचा जन्म भारतात कसा झाला, कदाचित तुम्हाला आकाशातून हाकलून लावण्यात आले असेल किंवा तुमचा जन्म आदमच्या भूमीवर झाला असेल”
हे ही वाचा :
अमृता पुजारी, विजय चौधरीने गाजवले वर्चस्व; जामनेरमध्ये कुस्तीचा फड
मराठी साहित्य संमेलन गीताचे राजभवनमध्ये उद्घाटन
भारत ड्रोनची निर्मिती करतोय म्हणून राहुल गांधींना उठलाय पोटशूळ
हनुमान चालिसा म्हणणाऱ्या भक्तांवर दगडफेक
टीकाकारांना उत्तर देताना आयएएस अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, “जर तुम्ही अनुवांशिकदृष्ट्या पाहिले तर इस्लाम अरबस्तानात होता आणि नंतर तो सर्व ५७ देशांमध्ये पसरला. मलेशिया, इंडोनेशियामध्येही मोठ्या संख्येने हिंदू, आदिवासी बहुसंख्य आहेत. भारतातही सनातन हिंदू धर्म प्रचलित होता. हा (इस्लाम) धर्म बाहेरून आला आहे. तो पसरला, लोकांनी या श्रद्धेचा स्वीकार केला. म्हणूनच कालांतराने दोन वेगवेगळे समुदाय तयार झाले आहेत. परंतु प्रत्येकाने तिथून (हिंदू) सुरुवात केली, ज्याचे अनुवांशिक पुरावे आहेत.
जेव्हा जेव्हा आपण जनुकांची चाचणी घेतो तेव्हा आपल्याला आढळते की प्रत्येकाचे जनुक भारताशी जुळते, कोणाचेही जनुक कुवेत, सौदी अरेबिया किंवा इराणशी जुळत नाही. जर एखाद्या भारतीयाचे जनुक सौदी, इराणशी जुळत असेल तर त्याने माझ्यासमोर बसावे, मी माझ्या वक्तव्यावर माघार घेईन.’आयएएस अधिकाऱ्याने असेही म्हटले की, मी कोणत्याही धर्माला कमी लेखण्यासाठी काहीही बोलत नाही. प्रत्येकाचा स्वतःचा स्वाभिमान असतो, धर्म ही वैयक्तिक बाब आहे, असे अधिकारी नियाज खान यांनी म्हटले.
Islam is the religion of Arabia.
All the people here were Hindus who were converted to Muslims.
: Madhya Pradesh cadre IAS officer Niaz Khan
"Islam is the religion of Arabia, here everyone was Hindu.
People were converted from Hindus to Muslims."
"Muslims who idolise Arabs… pic.twitter.com/tlXF5y1425
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) February 17, 2025