काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी हे एक ड्रोन दाखवत असून त्याबद्दल चुकीचे दावे करत आहेत. ड्रोनबद्दल भारताला फार काही माहिती नसल्याचे राहुल गांधी भासवत असून त्यांची विधाने ही भारतातील ड्रोन उद्योगाला नाकारत असून बंदी घातलेल्या चिनी डीजेआय ड्रोनचे मात्र अभिमानाने प्रदर्शन करताना दिसत आहेत. त्यांच्या या चुकीच्या विधानांना ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष स्मित शाह यांनी खोडून काढत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
भारतात ड्रोन्सच्या बॅटरी किंवा इतर भाग बनवले जात नसल्याचा राहुल गांधी यांचा दावा फोल ठरवताना स्मित शाह यांनी म्हटले आहे की, भारतात ४०० हून अधिक कंपन्या आहेत ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रोन्स बनवत आहेत. इतकेच नव्हे तर ड्रोन्सचे भाग बनवणाऱ्या ५० हून अधिक कंपन्या भारतात आहेत. हे सत्य असतानाही केवळ असं बोलणं की भारतात ड्रोन्स आणि त्याचे भाग बनवण्याची क्षमता आणि समजूत नाही, हे फारचं विचित्र आहे. हे भारतासाठी निरशाजनक आहे.
एका बंदी असलेल्या चीनी ड्रोनला राहुल गांधी दाखवत असून त्याची नोंदणी आहे की नाही याबद्दल काही कल्पना नाही. शिवाय हे ड्रोन ते उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे ड्रोन पायलट सर्टिफिकेट आहे का? शिवाय हा व्हिडीओ दिल्लीमध्ये शूट केल्याचे दिसून येत आहे. खरेतर हा परिसर रेड झोनमध्ये येतो. हे ड्रोन उडवण्यासाठी त्यांनी पूर्वपरवानगी घेतली होती का? असे अनेक प्रश्न स्मित शाह यांनी उपस्थित केले आहेत. केवळ टीका करून या क्षेत्रात भारत कशी प्रगती करेल याचे उत्तर मिळणार नाही. यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे.
ड्रोन्स क्षेत्रात भारताने काम करायला हवे ही बाब काही आता नवी राहिलेली नाही. ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि ड्रोन्सच्या भागांचे महत्त्व भारत सरकारने २०२१ मध्येचं जाणले आहे. २०२१ मध्येचं भारत सरकारने ड्रोन्स नियम आणत याची सुरुवात केली होती. सरकारच्या त्या निर्णयामुळेच आज १७०० ते १८०० करोडोंचा महसूल यातून मिळत आहे. शिवाय याला प्रोत्साहन देण्यासाठीही सरकारने पुढाकार घेतला आहे. विदेशी ड्रोन्सच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व जाणल्यामुळेचं सरकारने हे सर्व निर्णय घेतले आहेत. याला एक संधी म्हणून पाहत सरकारने ठरवले आहे की, २०३० पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन हब बनवायचे. त्यामुळे केवळ टीका करून काही होणार नसून त्यावर काम करायला हवे, असे स्मित शाह यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा..
बांगलादेश: मुस्लीम जमावाचा हिंदू दुकानावर हल्ला, दुर्गा मूर्तीची केली तोडफोड!
समय रैनाला इशारा, प्रत्यक्ष जबाब द्या, ऑनलाइन नाही!
छत्तीसगढच्या दुर्गमध्ये धर्मांतरावरून हिंदू संघटनेचा गोंधळ, पादरीसह चौघांना अटक!
व्यवस्थापन, परंपरांबाबत, मंदिरे ज्ञानाची केंद्रे व्हावीत यासाठी प्रयत्न करणार!
यावरून, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतात संरक्षण सामग्रीची निर्मिती होऊच नये म्हणून कांग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात ताकदीने प्रयत्न केले. याचे दोन प्रमुख उद्देश होते. एक तर संरक्षण सामुग्री आयात केली तर कमिशनचे फाळके मारता येतात, दुसरे भारत चीनसारख्या साम्राज्यवादी सत्तांसमोर दबून राहाते. २००८ मध्ये कांग्रेसने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी त्याच कारणासाठी करार केला असावा बहुधा. भारत आता या क्षेत्रात आत्मनिर्भरतेची पावले टाकतोय, देशी ड्रोनची निर्मिती करतोय म्हणून राहुल गांधींना कसा पोटशूळ उठलाय पाहा. चीनी मालकाचे जोडे पुसण्यासाठी त्यांनी देशी ड्रोन निर्मितीला लक्ष्य केलेले आहे.
भारतात संरक्षण सामग्रीची निर्मिती होऊच नये म्हणून कांग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात ताकदीने प्रयत्न केले.
याचे दोन प्रमुख उद्देश होते. एक तर संरक्षण सामुग्री आयात केली तर कमिशनचे फाळके मारता येतात, दुसरे चीनसारख्या साम्राज्यवादी सत्तांसमोर देश दबून राहातो.
२००८ मध्ये कांग्रेसने… https://t.co/vZGvAEvXS7— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 17, 2025