34 C
Mumbai
Saturday, March 15, 2025
घरक्राईमनामासमय रैनाला इशारा, प्रत्यक्ष जबाब द्या, ऑनलाइन नाही!

समय रैनाला इशारा, प्रत्यक्ष जबाब द्या, ऑनलाइन नाही!

‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शोच्या वादात महाराष्ट्र सायबर सेलकडून समय रैनाला निर्देश

Google News Follow

Related

कॉमेडियन समय रैना याने सादर केलेल्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या भागात डिजिटल कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहबादिया याने एका स्पर्धकाला अश्लील आणि अनैतिक प्रश्न विचारल्याने खळबळ उडाली होती. यानंतर समय रैना, रणवीर अलाहबादिया यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी आता समय रैना याच्या अडचणी आणखी वाढल्या असून ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शोमध्ये केलेल्या अश्लील टिपण्णीच्या वादात महाराष्ट्र सायबर सेलने समय रैना याला प्रत्यक्ष हजर राहून म्हणणे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

भारताबाहेर प्रवास करणाऱ्या समय रैनाने सायबर सेलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचे म्हणणे नोंदवण्याची विनंती केली होती. मात्र, ही विनंती फेटाळून लावत सायबर सेलने रैना याला १८ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून म्हणणे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वी गेल्या आठवड्यात, युट्यूबर रणवीर अलाहबादिया याने महाराष्ट्र सायबर सेलला कळवले होते की, त्याला आणि त्यांच्या कुटुंबाला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने, या प्रकरणाशी संबंधित एफआयआरच्या संदर्भात तो प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. तर, इंस्टाग्रामवर त्याने लिहिले की, “मी आणि माझी टीम पोलिस आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत. मी योग्य प्रक्रियेचे पालन करेन आणि सर्व एजन्सींना उपलब्ध राहीन. पालकांबद्दलचे माझे विधान असंवेदनशील आणि अनादरपूर्ण होते. चांगले काम करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि मला खरोखरच वाईट वाटते.” पुढे त्याने म्हटले होते की, त्याची आई, जी एक डॉक्टर आहे, त्यांच्या दवाखान्यात लोक रुग्ण असल्याचे भासवून त्रास देत आहेत.

हे ही वाचा : 

छत्तीसगढच्या दुर्गमध्ये धर्मांतरावरून हिंदू संघटनेचा गोंधळ, पादरीसह चौघांना अटक!

काँग्रेसचे चीन प्रेम पुन्हा दिसले

२०३६ ऑलिंपिकचे यजमान पद मिळाल्यास सर्वात हरित ऑलिंपिक भारतात होईल

संभल हिंसाचार प्रकरणी हसन आणि समदला अटक, दगडफेकीची दिली कबुली!

दरम्यान, समय रैना आणि पॉडकास्टर अपूर्वा मुखिजा, जे या वादग्रस्त शोच्या ज्युरीमध्ये उपस्थित होते, त्यांना राष्ट्रीय महिला आयोगासमोर (NCW) प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. ते पूर्वीच्या समन्सला उपस्थित नसल्याने त्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत. अपूर्वा मुखिजा, रणवीर अलाहबादिया आणि आशिष चंचलानी यांना ६ फेब्रुवारी रोजी समन्स बजावण्यात आले होते, तर समय रैना याला ११ फेब्रुवारी रोजी समन्स बजावण्यात आला होते. यांच्याव्यतिरिक्त, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोचे निर्माते, तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांनाही राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा