बांगलादेशातील पिरोजपूर जिल्ह्यातील नझीरपूर उपजिल्हा येथे शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रात्री मुस्लिम जमावाने एका हिंदू कुटुंबावर आणि दुर्गा मंदिरावर क्रूर हल्ला केला. १५-२० कट्टरपंथीयांनी रेबती गायेन यांच्या दुकानातील सामान लुटले आणि त्यांची पत्नी बिथी गायेन यांच्यावर हल्ला केला. मुस्लिम जमावाने मदतीसाठी आलेल्या हिंदूंनाही लक्ष्य केले. या हल्ल्यात १० हिंदू जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये दुर्गा मंदिर समितीचे अध्यक्ष मिलन गायन आणि त्यांची पत्नी इराणी गायन यांचाही समावेश आहे. हल्लेखोरांकडे रॉड आणि पाईप होते. त्यांनी दुर्गा मंदिरातील देवीची मुर्ती तोडली. हल्लेखोरांची ओळख पटली असून छब्बीर शेख, मुस्तकीन शेख आणि नयन शेख अशी त्यांची नावे आहेत. तर इतर अन्य हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. कट्टरवाद्यांनी हिंदू व्यावसायिकाला धमकी देत तेथून पळ काढला.
हल्ल्यानंतर या संदर्भात रेबती गायन यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत छब्बीर शेख, मुस्तकीन शेख आणि नयन शेख यांना अटक केली. दरम्यान, बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मारहाण, अपहरण, अत्याचार, हत्या, चोरीच्या दररोज अशा घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे तेथील हिंदू भयभीत झाला आहे. तेथील हिंदू कारवाई आणि सुरक्षेची हमी मागत आहे.
हे ही वाचा :
समय रैनाला इशारा, प्रत्यक्ष जबाब द्या, ऑनलाइन नाही!
छत्तीसगढच्या दुर्गमध्ये धर्मांतरावरून हिंदू संघटनेचा गोंधळ, पादरीसह चौघांना अटक!
व्यवस्थापन, परंपरांबाबत, मंदिरे ज्ञानाची केंद्रे व्हावीत यासाठी प्रयत्न करणार!
लष्कर-ए-तोयबाच्या वरिष्ठ कमांडरची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या
मात्र, युनुस सरकार आणि पोलीस प्रशासन कट्टरवाद्यांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीयेत. बांगलादेशातील हिंदू सुरक्षित असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, दररोजच्या अशा घटनांमुळे सरकारने खोटे बोलत असलाचे स्पष्ट होते. याबाबत भारत सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी अनेकांकडून केली जात आहेत. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नुकताच अमेरिका दौरा पार पडला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान बांगलादेशाचाही विषय निघाला. यावर ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, बांगलादेशाबाबत मोदींनी निर्णय घ्यावा, आमची काहीही भूमिका नाही. त्यामुळे भारत सरकार बांगलादेश विरुद्ध कोणती कठोर पावले उचलणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.