राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (१७ फेब्रुवारी) आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला ते हजेरी लावणार आहेत. दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची भेट झाली.
तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रा बाबू नायडू आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
ते पुढे म्हणाले, टेम्पल कन्वेक्शनच्या माध्यमातून देशभरातील आपली जी मंदिरे आहेत, त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे, त्यांच्या परंपरा योग्य प्रकारे चालाव्यात आणि मंदिरे ही ज्ञानाची केंद्र व्हावीत अशा प्रकारचा प्रयत्न आहे. यासाठी भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी खूप पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे अभिनंदन.
हे ही वाचा :
पाकिस्तानकडून अफगाणीस्तानमध्ये हवाई हल्ले
२०३६ ऑलिंपिकचे यजमान पद मिळाल्यास सर्वात हरित ऑलिंपिक भारतात होईल
काँग्रेसचे चीन प्रेम पुन्हा दिसले
संभल हिंसाचार प्रकरणी हसन आणि समदला अटक, दगडफेकीची दिली कबुली!
या निमित्ताने आज भगवान बालाजींचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. भगवान बालाजी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात, सर्वांना भरभरून आशीर्वाद देतात. भगवान बालाजींनी निवडणुकीत दिलेल्या भरभरून आशीर्वादामुळे त्यांचे आभार मानले आहेत आणि या पुढे आपले राज्य योग्य पद्धतीने चालावे या दृष्टीने भगवान बालाजींनी शक्ती द्यावी असे आशीर्वाद मागितले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत यावेळी भाजपा नेते आशिष शेलार, प्रवीण दरेकरसह आदि नेते उपस्थित होते.