रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्स ऑन इंडियन बिझनेस, पॉलिसी ऍण्ड कल्चर येथे भाषण दिले. यावेळी त्यांनी ऑलिंपिक स्पर्धांच्या आयोजनासाठी भारताच्या सक्षमतेबद्दल आणि या स्पर्धेला सर्वात हरित आणि शाश्वत ऑलिंपिक कसे बनवायचे याबद्दल भाष्य केले.
बोस्टनमध्ये हार्वर्ड विद्यापीठाच्या इंडिया कॉन्फरन्स ऑन इंडियन बिझनेस, पॉलिसी ऍण्ड कल्चर येथे बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, “मला वाटते की, भारतात ऑलिंपिक स्पर्धा झाल्याच पाहिजेत कारण आपण लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. जर तुम्ही जगातील १० सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांकडे पाहिले तर, नऊ देशांनी ऑलिंपिकचे आयोजन केले आहे, परंतु फक्त भारताने अद्याप या स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. देशात ऑलिंपिकचे आयोजन व्हावे अशी इच्छा असून ही स्पर्धा आयोजित करणे अभिमानाची गोष्ट असेल. म्हणूनच, पंतप्रधानांनीही नमूद केले की, भारत २०३६ च्या ऑलिंपिकसाठी बोली लावेल.”
पुढे नीता अंबानी म्हणाल्या की, मला वाटते की आपण एक शाश्वत ऑलिंपिक आयोजित करण्याची योजना आखत आहोत. स्टेडियम आणि कॅम्पसचे नूतनीकरण, पुनर्वापर करण्याची योजना आखत आहोत. जर आपण त्यासाठी बोली लावली आणि ते मिळवले, तर आम्ही खात्री देतो की, आतापर्यंतचे सर्वात हरित ऑलिंपिक हे भारतात होईल. मला वाटते की, भारतात ऑलिंपिकचे आयोजन करण्यासाठी ही योग्य वेळी आहे.
हे ही वाचा :
संभल हिंसाचार प्रकरणी हसन आणि समदला अटक, दगडफेकीची दिली कबुली!
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची डरकाळी; तीन दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार
दिल्लीनंतर बिहारमध्ये भूकंपाचा धक्का; ४ रिश्टर स्केलची तीव्रता
११२ अनधिकृत भारतीयांची तिसरी तुकडी अमृतसरमध्ये दाखल
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास भारत तयार असल्याचे म्हटले होते. भारताचे क्रीडा क्षेत्रात खूप उज्ज्वल भविष्य आहे. २०३६ मध्ये ऑलिंपिकचे आयोजन करण्यास तयार आहोत, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला होता. यानंतर आता नीता अंबानी यांनीही हा विश्वास दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले होते की, त्यांचे सरकार २०३६ च्या ऑलिंपिकचे यजमानपद मिळविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहे. २०३६ च्या ऑलिंपिकच्या यजमानपदासाठी प्रयत्न करत आहोत, ते भारतीय खेळांना नवीन उंचीवर घेऊन जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.