महाकुंभ परिसरात पुन्हा आगीची घटना घडली आहे. महाकुंभाच्या सेक्टर ८ मधील एका कॅम्पमध्ये ही आग लागली. तथापि, घटनास्थळी उपस्थित असलेल्या आरएएफ, यूपी पोलिस आणि अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली. आगीची ही चौथी घटना आहे. दरम्यान, आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
श्री कपी मानस मंडळ छावणीच्या दोन तंबूंना ही आग लागली. परिसरात तैनात असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. यापूर्वी महाकुंभाच्या सेक्टर १९ मधील काही रिकाम्या तंबूंना आग लागली होती. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
७ फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळा परिसरात आगीची घटना घडली होती. आगीच्या घटनेचे व्हिडिओही समोर आले होते. याच दरम्यान, शंकराचार्य मार्गावरील सेक्टर १८ मध्ये आग लागली होती. तंबूत ज्वाला उठताना दिसत होत्या. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. महाकुंभमेळ्यातील सेक्टर २२ च्या बाहेरील चमनगंज चौकीजवळील एका तंबूला आग लागली होती. यामुळे तब्बल १५ तंबू जळून खाक झाले होते. सुदैवाने या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
हे ही वाचा :
हनुमान चालिसा म्हणणाऱ्या भक्तांवर दगडफेक
बांगलादेश: मुस्लीम जमावाचा हिंदू दुकानावर हल्ला, दुर्गा मूर्तीची केली तोडफोड!
छत्तीसगढच्या दुर्गमध्ये धर्मांतरावरून हिंदू संघटनेचा गोंधळ, पादरीसह चौघांना अटक!
व्यवस्थापन, परंपरांबाबत, मंदिरे ज्ञानाची केंद्रे व्हावीत यासाठी प्रयत्न करणार!
दरम्यान, महाकुंभ परिसरात लाखो भाविक दररोज उपस्थित होते आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत ५१ करोडहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. १३ जानेवारीला सुरु झालेला महाकुंभ २६ फेब्रुवारीला संपणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे शेवटचे स्नान असणार आहे.