केरळमधील पलक्कड या ठिकाणी हमास आणि हिजबुल्लाच्या नेत्यांचे फोटो झळकल्यामुळे गोंधळ उडाला. याह्या सिनवर, इस्माइल हनिये, हसन नसरल्ला या दहशतवाद्यांचे फोटो एका मशिदीच्या वार्षिक उत्सवाच्या मिरवणुकीत झळकवण्यात आले. या तिन्ही दहशतवाद्यांना इस्रायलने ठार मारले आहे.
हत्तीच्या सहाय्याने काढलेल्या मिरवणुकीत काही तरुण हत्तीवर बसून या दहशतवाद्यांचे फोटो झळकावत होते. विशेष म्हणजे या मिरवणुकीत काही कम्युनिस्ट आणि काँग्रेस नेतेही सामील झाले होते.
काँग्रेसचे नेते व्हीटी बलराम आणि मंत्री एमबी राजेश हे त्यात सामील झालेले असल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्रितला येथील मशिदीतून उरुसच्या निमित्तानेही मिरवणूक काढण्यात येते. त्यात ३ हजार लोक सामील झाले होते. या दहशतवाद्यांचे फोटो झळकावल्यानंतर जमावातून त्यांचे कौतुक होत होते. पण अशा पद्धतीचे पोस्टर्स झळकावल्याबद्दल आयोजकांवर टीका होत आहे.
हे ही वाचा:
नियाज खान म्हणतात, इस्लाम अरब देशातला, भारतातील हिंदू मुस्लिमांचा डीएनए एकच!
घरगुती वादातून पित्याने ३ महिन्याच्या मुलीला जमिनीवर आपटले
भास्कर जाधव उद्धव ठाकरेंच्या हुकुमशाहीत अडकलेत!
समय रैनाला इशारा, प्रत्यक्ष जबाब द्या, ऑनलाइन नाही!
गेल्या वर्षी केरळ विद्यापीठात इन्तिफदा हा युवा महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कारण हा शब्द पॅलेस्टाइन-इस्रायल युद्ध आणि हमासला याच्याशी संबंधित होता. त्यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मोहनन कुन्नुमल यांनी त्याला विरोध केला आणि या उत्सवाचे सर्व पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यास सांगितले.
ऑक्टोबर २०२३ मध्ये खालिद मशाल या हमासच्या माजी नेत्याने मल्लापुरम येथील एका सभेत भाषण केले होते. सॉलिडेरिटी युथ मूव्हमेंट या संस्थेने ही सभा आयोजित केली होती. ही संस्था जमात इ इस्लामी या संघटनेची युवा शाखा आहे. हिंदुत्व उद्ध्वस्त करा असा संदेश देत ही युवा शाखा काम करत होती.