29 C
Mumbai
Saturday, October 1, 2022
घरविशेषकेरळमध्ये रिक्षावाल्याचे भाग्य उजळले; जिंकले तब्बल २५ कोटी

केरळमध्ये रिक्षावाल्याचे भाग्य उजळले; जिंकले तब्बल २५ कोटी

रिक्षावाला २२ वर्षे तिकीट काढत होता, अखेर यश आलेच

Related

केरळमधील एका रिक्षाचालकाचे नशीब फळफळले आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये प्रश्नांची उत्तरे देऊन करोडपती बनलेले आपण पाहिले आहेत. पण केरळचा हा रिक्षाचालक अनूप ओणम बम्पर लॉटरीचे तिकीट जिंकला असून त्याला मिळालेली रक्कम आहे २५ कोटी.

अनूप हा मलेशियात शेफ म्हणून काम करण्यास जाणार होता. त्यासाठी त्याने ३ लाखांच्या कर्जासाठी अर्जही केला होता. हे तिकीट त्याने शनिवारी घेतले होते. तिकीट घेताना त्याने आधी एक तिकीट निवडले पण नंतर ते बदलून दुसरे घेतले. जे त्याच्यासाठी लकी ठरले.

बँकेत केलेल्या कर्जाच्या अर्जाबाबत तो म्हणाला की, आज मला बँकेत जायचे होते. बँकेने मला बोलावले होते पण मी त्यांना सांगितले की, मला आता त्याची गरज नाही. मी मलेशियालाही आता जाणार नाही. गेली २२ वर्षे अनूप लॉटरीचे तिकीट काढत आहे. त्यातून त्याने काहीशे रुपये जिंकलेही आहेत. जास्तीतजास्त ५ हजाराची लॉटरीही त्याला लागली आहे.

अनूप म्हणाला की, मला लॉटरी लागेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळे टीव्हीवर याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना मी पाहात नव्हतो पण मी जेव्हा मोबाईलवर पाहिले तेव्हा मी जिंकल्याचे दिसले. मला विश्वासच बसला नाही. मी माझ्या बायकोला तिकीट दाखवले. तिनेही सांगितले की, जे तिकीट काढले होते तोच तिकिटाचा क्रमांक आहे. तरीही माझ्या मनात प्रश्न होता. मग मी ज्यांच्याकडून लॉटरी घेतली त्या महिलेला फोन केला. तिनेही हाच लकी नंबर असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

महाराष्ट्र, गुजरात व्हाया पाकिस्तान

केसरकरांच्या मनातूनही ठाकरे उतरले

‘उद्धव यांचे अस्तित्व संपले, आहे ते फक्त मातोश्रीपुरते’

‘भ्रष्टाचारी लोकांना निवडून देऊ नका’

 

आता या २५ कोटींपैकी करापोटी काही रक्कम कापली जाणार आहे. त्यामुळे अनूपच्या हाती १५ कोटी रुपये येणार आहेत. या पैशाचे काय करणार असे विचारल्यावर तो म्हणतो की, माझ्यावर जे काही कर्ज आहे ते सर्वप्रथम मी फेडणार आणि नंतर माझ्या कुटुंबासाठी एक चांगले घर बांधणार.

योगायोगाची गोष्ट म्हणजे गेल्यावर्षीही ओणम लॉटरी एका रिक्षावाल्यानेच जिंकली होती. त्यावेळी मात्र ती जिंकलेली रक्कम १२ कोटी होती. यावर्षी दुसरे बक्षीस ५ कोटींचे असून १० जणांनी १ कोटी जिंकले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा