24 C
Mumbai
Thursday, July 25, 2024
घरविशेषमुख्यमंत्री पिनाराई विजयन, मुलगी वीणा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाची नोटीस!

मुख्यमंत्री पिनाराई विजयन, मुलगी वीणा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाची नोटीस!

७ जुलै रोजी होणार सुनावणी

Google News Follow

Related

मंगळवार, १८ जून रोजी केरळ उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री पिनाराई विजयन, त्यांची मुलगी वीणा थाईकंडिल आणि इतरांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे काँग्रेस आमदार मॅथ्यू कुझलनादन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निर्देश दिले. काँग्रेस आमदाराने याचिकेत मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या आता बंद पडलेल्या आयटी फर्म आणि खाजगी खाण कंपनी यांच्यातील कथित आर्थिक व्यवहाराबद्दल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात चौकशीची मागणी केली आहे.

न्यायमूर्ती के. बाबू यांनी मुख्यमंत्री विजयन, त्यांची मुलगी वीणा, त्यांची फर्म एक्झालॉजिक सोल्युशन्स आणि खाण कंपनी कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड (सीएमआरएल) यांना नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणावर ७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सीएमआरएलने सन २०१७ ते २०२०दरम्यान वीणा यांच्या आयटी फर्मला १.७२ कोटी रुपये दिले असल्याची बातमी आल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री, त्यांची मुलगी आणि सत्ताधारी सीपीआय(एम) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांच्या आयटी फर्मने कोणतीही सेवा प्रदान केली नसली तरी ती रक्कम “एका प्रतिष्ठित व्यक्तीशी असलेल्या तिच्या संबंधांमुळे” दरमहा दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला.

केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन म्हणाले की, आमदार मॅथ्यू कुझलनादन यांच्या कायदेशीर लढाईच्या मागे काँग्रेस पक्ष समर्थपणे उभा आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणारी त्यांची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळल्यानंतर कुझलनादन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ६ मे रोजी विशेष न्यायाधीशांनी तक्रार फेटाळली होती. याचिकेत भ्रष्टाचारासाठी आवश्यक तथ्यांचा समावेश नाही, असे न्यायालयाने नमूद केले होते.

आपल्या याचिकेत, काँग्रेस आमदाराने वीणा यांच्या आयटी फर्म एक्झालॉजिकला खाण मंजुरीसाठी सीएमआरएलकडून मासिक पैसे मिळाल्याच्या आरोपांची दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशी करण्याची मागणी केली होती.

हे ही वाचा..

‘हमारे बारह’ चित्रपटात मुस्लिम समाजाविरुद्ध काहीही नाही!

उष्णतेमुळे ५७७ हज यात्रेकरूंचा मृत्यू; ५१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पावो नूरमी स्पर्धेत नीरज चोप्राला सुवर्णपदक

सुंजवान आर्मी कॅम्प दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अमीर हमजाची पाकिस्तानात हत्या

कथित आर्थिक व्यवहार एजन्सींच्या रडारवर
अंमलबजावणी संचालनालय (ईडी), गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) आणि आयकर विभागासह अनेक एजन्सींनी या प्रकरणात टी वीणा वगळता अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. यापूर्वी, २७ मार्च २०२४ रोजी, ईडीने मुख्यमंत्र्यांची मुलगी वीणा आणि तिच्या कंपनीला आयटी फर्मने खाण कंपनीला कोणतीही सेवा न देता बेकायदा पेमेंट दिल्या संदर्भात त्यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचा खटला दाखल केला होता.

सूत्रांचा हवाला देत वृत्तात असे म्हटले आहे की, केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची तपास शाखा असलेल्या एसएफआयओने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत ईडीने वीणा आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. अलप्पुझा आणि कोल्लमच्या किनारी भागात वाळू उत्खननासाठी केरळ सरकारकडून खाण कंपनीला मिळालेल्या मर्जीसाठी बेकायदा देयके असल्याचा संशय असलेल्या व्यवहारांची एसएफआयओकडून आधीच चौकशी सुरू आहे.

बेकायदा आर्थिक व्यवहारांबाबतचे प्रकरण काँग्रेस नेत्याने गेल्या वर्षी बाहेर काढले होते. ज्यामध्ये एक्सलॉजिक सोल्युशन्सला सीएमआरएलकडून १.७२ कोटी रुपये मिळाले होते. काँग्रेस आमदाराने आरोप केला होता की सीएमआरएलने एक्सलॉजिक सोल्युशन्स आणि श्रीमती वीणा थाईकंडिल यांना काही बोगस पेमेंट केले आहे. मुख्यमंत्र्यांची मर्जी मिळवण्यासाठी आणि कंपनीचे कामकाज सुरळीत चालावे. यासाठी हे पैसे देण्यात आल्याचा आरोप आहे.

शिवाय, असा दावा केला जात आहे की, दरमहा रु. तीन लाख एक्झालॉजिलकला तिच्या आयटी आणि विपणन सल्लागार सेवांचा लाभ घेण्याच्या नावाखाली केले गेले. शिवाय, रु. पाच लाख कथितपणे श्रीमती वीणा थाईकंडिल यांना प्रत्येक महिन्याला कथितपणे त्यांना आयटी आणि मार्केटिंग सल्लागार म्हणून दिले जात होते. वृत्तानुसार, एक्झालॉजिक सोल्युशन्स ही एका व्यक्तीची कंपनी आहे आणि मुख्यमंत्र्यांची मुलगी वीणा थाईकंडिल या तिच्या एकमेव संचालक आहेत. मुख्यमंत्री विजयन यांच्या कथित भ्रष्टाचारावर कोचीच्या रहिवाशाने अशीच याचिका दाखल केली होती, परंतु याचिकाकर्त्याचा मृत्यू झाला. तर, मंगळवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ॲमिकस क्युरीची नियुक्ती केली आणि दोन्ही याचिका समान असल्या तरी त्यावर स्वतंत्रपणे सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा