झारखंडमधील पूर्वी सिंहभूम (जमशेदपूर) जिल्ह्यातील चाकुलिया येथील जुना बाजार भागात एका सोन्याच्या व्यापाऱ्याकडून लुटलेलं दीड कोटी रुपये किमतीचं सोनं केवळ १८ तासांत पोलिसांनी परत मिळवलं आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. चाकुलिया नगर पंचायत क्षेत्रातील रहिवासी अरुण नंदी उर्फ खोखन नंदी हे बिरसा चौकाजवळ ‘प्राप्ति ज्वेलर्स’ नावाचं दागिन्यांचं दुकान चालवतात. रोज संध्याकाळी दुकान बंद केल्यानंतर ते दागिने आणि मौल्यवान वस्तू आपल्या घरी नेत असतात. सोमवारी रात्री ८.१५ वाजता दुकान बंद करून दागिन्यांनी भरलेली पिशवी घेऊन ते मिस्त्रीपाड़ा परिसरातील आपल्या घराच्या दारात पोहोचले असता, बाईकवरून आलेल्या तिघा गुन्हेगारांनी त्यांना घेरलं.
गुन्हेगारांनी त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून व पिस्तूल दाखवून त्यांच्या हातातील बॅग लुटून नेली. या बॅगेत सुमारे दीड किलो सोने व ५०,००० रुपये रोख रक्कम होती. लुटून पळून जात असताना अरुण नंदी यांनी आरडाओरड केली, गावकऱ्यांनीही लुटेऱ्यांचा पाठलाग केला, पण पिस्तूल दाखवत धमकी देत लुटेरे पसार झाले.
हेही वाचा..
…तर ‘एअर लोरा’ कराची, रावळपिंडी, बहावलपूरला लक्ष्य करू शकते!
नसीरुद्दीन शाह यांचे ‘भारतापेक्षा पाकिस्तानप्रेम मोठं?’
मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची भाषा करणारे मराठीच्या मुद्द्यावर वेगळे झाले होते का?
उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे असतील तर काँग्रेसचा टाटा-बाय बाय?
घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. गुन्हेगार पश्चिम बंगालच्या दिशेने पळाले होते. चाकुलिया पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोष कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने पश्चिम बंगाल पोलिसांना माहिती दिली. काही तासांतच, पश्चिम बंगालमधील जामबनी पोलीस ठाण्याच्या मदतीने दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले असे : रफीगंज, औरंगाबाद (बिहार) येथील रहिवासी मोहम्मद रफीक, बागबेड़ा, जमशेदपूर येथील रहिवासी निरंजन गौड. गुन्हेगारांना चाकुलिया पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
