26 C
Mumbai
Tuesday, March 18, 2025
घरविशेषकाँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल हत्या प्रकरणी एकाला अटक!

काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल हत्या प्रकरणी एकाला अटक!

आरोपी महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती

Google News Follow

Related

हरियाणातील हिमानी नरवाल हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे हरियाणा पोलिसांनी सांगितले. १ मार्च रोजी रोहतकमधील एका महामार्गाजवळ सूटकेसमध्ये हिमानी नरवालचा मृतदेह आढळला होता.

आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली असून त्याचे नाव सचिन असे आहे, तो बहादूरगडचा रहिवासी आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हिमानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि ती त्याला ब्लॅकमेल करत होती आणि त्याच्याकडून लाखो रुपये उकळत होती. हिमानीचा मृतदेह ज्या सुटकेसमध्ये सापडला तो तिचा होता आणि तिची हरियाणातील तिच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, एका आरोपीला अटक झाल्यानंतर लगेचच, हिमानीच्या कुटुंबाने मृत्युदंडाची मागणी केली आणि आज तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असे सांगितले. “एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि आज आम्ही तिच्यावर (हिमानी नरवाल) अंत्यसंस्कार करणार आहोत. माध्यमांमध्ये खूप अफवा पसरवल्या जात आहेत… आम्हाला न्याय मिळेल… आम्हाला अजूनही आरोपी कोण आहे हे माहित नाही; पोलिसांनी आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही… आम्हाला आरोपीला मृत्युदंड हवा आहे,” असे हिमानीचा भाऊ जतिन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. तथापि, आरोपीची ओळख उघड होईपर्यंत हिमानी नरवालचे काका रविंदर यांनी तिचे अंत्यसंस्कार करणार नसल्याचे सांगितले, असे एएनआयने वृत्त दिले.

हे ही वाचा : 

फसवणूक झालेल्या हिंदू तरुणीची सुखरूप सुटका

नजरकैदेत ठेवून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले

आरजी कार प्रकरण : ११ पोलीस कर्मचाऱ्याना सीबीआयचे समन्स

धनंजय मुंडेंचा एन्ड गेम सुरु…

हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सांपला शहरात एका महिला काँग्रेस कार्यकर्त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला होता. हा मृतदेह काँग्रेसच्या सक्रिय सदस्या असलेल्या काँग्रेस महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा असल्याचे निष्पन्न झाले. तिने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही भाग घेतला होता. याशिवाय, यापूर्वी ती माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या निवडणूक प्रचारातही सक्रिय राहिली आहे. आता हिमानी नरवालच्या आईने मोठा आरोप केला आहे आणि म्हटले आहे की निवडणुका आणि पक्षाने त्यांच्या मुलीचा जीव घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा