दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोमवारी सांगितले की दिल्ली सरकार २४ ते २६ मार्च दरम्यान विधानसभेत २०२५-२६ साठी ‘विक्षित दिल्ली’ बजेट सादर करणार आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, समाजातील विविध घटकांच्या सूचनांचा समावेश करून अर्थसंकल्प तयार केला जाईल.
त्या म्हणाल्या, हा लोकांचा अर्थसंकल्प बनवण्यासाठी आम्ही विविध महिला संघटनांच्या प्रतिनिधींना ५ मार्च रोजी विधानसभेच्या आवारात भेटणार आहोत. शिवाय आम्ही ६ मार्च रोजी शिक्षण क्षेत्रातील भागधारक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करू. त्यांनी एक ईमेल आयडी आणि एक व्हॉट्सॲप नंबर देखील शेअर केला आहे. त्यात दिल्लीचे रहिवासी बजेटसाठी त्यांच्या सूचना पाठवू शकतात.
हेही वाचा..
काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल हत्या प्रकरणी एकाला अटक!
नजरकैदेत ठेवून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले
फसवणूक झालेल्या हिंदू तरुणीची सुखरूप सुटका
आरजी कार प्रकरण : ११ पोलीस कर्मचाऱ्याना सीबीआयचे समन्स
गुप्ता यांनी पुनरुच्चार केला की, भाजपच्या ‘संकल्प पत्र’मध्ये दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील आणि त्यांचे सरकार या दिशेने युद्धपातळीवर काम करत आहे. त्या म्हणाल्या, विधानसभेत आतापर्यंत फक्त दोन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) अहवाल सादर केले गेले आहेत आणि त्यांनी यापूर्वीच्या आप सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप उघड केले आहेत.
आणखी १२ कॅग अहवाल अद्याप सादर व्हायचे आहेत आणि आणखी अनियमितता समोर येण्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी मंत्री परवेश साहिब सिंग, आशिष सूद आणि मनजिंदर सिंग सिरसा उपस्थित होते.