केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान ही घटना घडली होती. या प्रकरणी काल (२ मार्च) केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. मंत्री रक्षा खडसे यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी छेड काढणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचा समावेश आहे. तर एका अल्पवयीन मुलगा ही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी माहिती देताना काल सांगितले की, या प्रकरणी अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरु असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले होते. अखेर पोलिसांनी कारवाई करत अनुज पाटील, अनिकेत भोई आणि किरण माळी या तिघांना अटक केली तर उर्वरित फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याबाबत माहिती देताना मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, महाशिवरात्रीच्या निमित्ताने कोथळी गावात संत मुक्ताई यांची यात्रा असते. माझ्या मुलीने यात्रेत जाणार असल्याचे सांगितले. मी गुजरातला असल्या कारणाने गार्ड आणि ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना घेवून यात्रेत जाण्यास सांगितले. मुलीसोबत तिच्या मैत्रीनीही होत्या.
हे ही वाचा :
काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल हत्या प्रकरणी एकाला अटक!
नजरकैदेत ठेवून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले
फसवणूक झालेल्या हिंदू तरुणीची सुखरूप सुटका
काँग्रेसने रोहित शर्माची खिल्ली उडवताच भाजप आक्रमक
यात्रेत सहभागी झाल्यानंतर काही टवाळखोरांनी त्यांचा पाठलाग केला, जबरदस्तीने त्यांच्या पाळण्यात बसले. आमच्या सुरक्षा रक्षकाने आमच्या मुलींना त्या पाळण्यातून उतरवून दुसऱ्या पाळण्यात बसवेल. मात्र, तेथेही टवाळखोरांनी तोच प्रकार केला, त्याच पाळण्यात येवून बसले. ते तरुण मोबाईलवर व्हिडीओ काढत असल्याचे समोर येताच सुरक्षा रक्षकाने मोबाईल हिसकावून पाहिले असता अन्य कोणाला तरी व्हिडीओ कॉल केल्याचे निदर्शनास आले. यावेळी सुरक्षा रक्षकांसोबत त्यांनी धक्काबुक्की केली, मुलींसोबत छेडछाड केली, असे मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.