29.1 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरविशेषसाकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

मुसळधार पावसात घडली दुर्दैवी घटना

Google News Follow

Related

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (२ जुलै) घडली. खैरानी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर संबंधित व्यक्तीला बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे नाव अस्लम अन्सारी असे असून, ते मोबाईलवर बोलत असताना उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने त्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्या ठिकाणी खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे मॅनहोलचे झाकण काढण्यात आले होते.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, साकीनाका पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला शोध मोहिमेदरम्यान अस्लम अन्सारी यांची छत्री आणि चप्पल आढळून आली. पावसाच्या पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने ते वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. बचाव पथकाने शोधमोहीम सुरू ठेवली असता, ते ज्या मॅनहोलमध्ये पडले होते, त्यापासून सुमारे १५ ते २० फूट अंतरावरील दुसऱ्या मॅनहोलमध्ये ते आढळून आले. संबंधित मॅनहोल सुमारे २० ते २५ फूट खोल असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांसह महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधीही घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत.

हे ही वाचा:

“ताकाइची माझी धाकटी बहीण”; मोदींनी भारत- जपान संबंधांना दिला नवा आयाम

व्हेनेझुएलात भारताच्या ‘ऑपरेशन अमिस्ताद’चे कौतुक

होर्मुझमधील गोळीबारानंतर कच्चे तेल घेऊन जहाज भारतात दाखल

‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात अमरनाथ यात्रेला प्रारंभ

मृताचे भाऊ म्हणाले की, पावसामुळे अस्लम घरी परतत होते. रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू असले तरी उघड्या मॅनहोलजवळ कोणतेही बॅरिकेड्स, इशारा फलक किंवा सुरक्षेची व्यवस्था नव्हती. निष्काळजीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मॅनहोल उघडे ठेवण्यात आले होते का, सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का आणि संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी काय होती, याचा तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा