मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराकमधून जवळपास २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन भारताकडे येणाऱ्या एमटी सन्मार हेराल्ड या तेलवाहू जहाजावर होर्मुझच्या सामुद्रधुनीत गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारात जहाजाच्या ब्रिजच्या काही भागाला छऱ्यांमुळे किरकोळ नुकसान झाले. मात्र, जहाजावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित असून हे जहाज ओडिशातील पारादीप बंदरात सुखरूप पोहोचले आहे.
एमटी सन्मार हेराल्डने इराकमधील बसरा बंदरातून बसरा मीडियम आणि बसरा हेवी प्रकारचे कच्चे तेल भारतासाठी आणले होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणच्या सागरी हद्दीजवळून प्रवास करत असताना जहाजावर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून जहाजाने काही काळ आपला मार्ग बदलला आणि त्यानंतर भारतीय किनाऱ्याकडे प्रवास सुरू ठेवला. भारतीय किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर हे जहाज पारादीप बंदरापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर नांगरण्यात आले. त्यानंतर बंदराच्या सिंगल पॉइंट मूरिंग (SPM) प्रणालीद्वारे जहाजातील कच्च्या तेलाची उतराई सुरू करण्यात आली.
पारादीप पोर्ट अथॉरिटीने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण प्रवासादरम्यान जहाजाने भारतीय नौदलाशी सातत्याने संपर्क ठेवला. होर्मुझच्या सामुद्रधुनीत नुकसान होऊनही जहाजाने सुरक्षितपणे आपला प्रवास पूर्ण करत भारत गाठला. या जहाजावर कॅप्टनसह सुमारे २२ खलाशी होते. अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक सागरी मार्गातून त्यांनी धैर्याने प्रवास पूर्ण केल्याबद्दल पारादीप बंदर प्रशासनाने जहाजावर जाऊन कर्णधार आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
A Journey of Courage, Resilience & Safe Arrival at Paradip Port
Today, MT SANMAR HERALD safely arrived at Paradip Port and berthed at SPM-I at 11:30 hrs on 01 July 2026, marking the successful completion of an extraordinary voyage through one of the most challenging geopolitical… pic.twitter.com/7t9jZowcBQ
— Paradip Port Authority (@paradipport) July 1, 2026
हे ही वाचा:
‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात अमरनाथ यात्रेला प्रारंभ
दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेले चार जण जेरबंद
‘मेक इन इंडिया’ला जपानचा पाठिंबा! अर्थकारण, संरक्षण, सेमिकंडक्टर भागीदारीला चालना
पाकिस्तानातील १२५ वर्षे जुन्या गुरुद्वाराच्या तोडफोडीवर भारताचा संताप
पारादीप पोर्ट अथॉरिटीने आपल्या निवेदनात म्हटले की, संपूर्ण संकटाच्या काळात जहाजाच्या कॅप्टनने आणि कर्मचाऱ्यांनी उच्च दर्जाची व्यावसायिकता, संयम आणि सुरक्षेबाबतची बांधिलकी दाखवली. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली झाल्यानंतर जहाजाने आपला प्रवास पुन्हा सुरू केला आणि कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षितपणे पारादीप येथे पोहोचले.







