27 C
Mumbai
Monday, March 2, 2026
घरविशेषनागपूर काटोल औद्योगिक परिसरात भीषण स्फोट

नागपूर काटोल औद्योगिक परिसरात भीषण स्फोट

१२ कामगारांचा मृत्यू, १५ जखमी

Google News Follow

Related

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात आज सकाळी भीषण स्फोटाची घटना घडली. काटोल औद्योगिक परिसरात असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास प्रचंड स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान १२ कामगारांचा मृत्यू झाला असून सुमारे १५ कामगार जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दूरवरपर्यंत ऐकू गेला. स्फोटानंतर कंपनीच्या इमारतीचा काही भाग कोसळला आणि परिसरात धूर व आगीचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले. अनेकांना भाजल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले.
हे ही वाचा:
कमी दृश्यमानता, बारामती विमानतळावरील मोठ्या प्रमाणावरील उणिवांमुळे अपघात 

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक बाजारात खळबळ

केरळ स्टोरी २ ने केली शनिवारी भरगच्च कमाई

“समलैंगिक व्यक्तीला राज्यसभेत पाठवणे इस्लामविरोधी; तृणमूलने प्रोत्साहन देऊ नये”

सदर कंपनीत बारुद, डेटोनेटर आणि विविध प्रकारचे स्फोटक साहित्य तयार केले जाते. प्राथमिक माहितीनुसार उत्पादन विभागात नियमित काम सुरू असतानाच अचानक स्फोट झाला. मात्र स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, रासायनिक प्रतिक्रिया किंवा सुरक्षेतील त्रुटी यापैकी कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली, याचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे काटोल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मोठा आवाज ऐकून नागरिक घराबाहेर पडले. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्याबाबत चर्चा सुरू आहे. औद्योगिक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून तपास अहवालानंतर स्फोटाचे नेमके कारण समोर येण्याची अपेक्षा आहे.

या भीषण दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्फोटकांसारख्या धोकादायक पदार्थांवर काम करताना अत्यंत काटेकोर सुरक्षा उपायांची गरज असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा